तरुण भारत

प्रमुख 30 स्टार्टअप्सची यादी जाहीर

सिलिकॉन व्हॅली सर्वोच्च स्थानी : ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टमचा अहवाल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामधील स्टार्टअप राजधानी किंवा सिलिकॉन व्हॅली म्हणून बेंगळूर ओळखली जाते. कारण जगातील प्रमुख 30 स्टार्टअपच्या इकोसिस्टम मानांकनात बेंगळूरच्या एकमेव शहराचा समावेश झाला आहे. बेंगळूरला या रँकिंगमध्ये 26 वे स्थान मिळाले आहे तर देशाच्या राजधानीला यातून 36 वे स्थान मिळवण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम 2020 अहवालातून देण्यात आली आहे.

जगातील प्रमुख 30 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये कॅलिफोर्नियाची सिलिकॉन व्हॅली सर्वोच्च स्थानी राहिली आहे. प्रमुख 100 इमर्जिंग इकोसिस्टम रँकिंगमध्ये मुंबईने बाजी मारली आहे तर अन्य शहरांमध्ये चेन्नई, हैदराबाद आणि पुणे यासारख्या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये स्टार्टअप्सला पॅरिस आणि सिंगापूरसारख्या चांगल्या सुविधा आणि वित्तीय लाभ मिळण्याची संधी आहे. कॅपिटल इन्वेस्टमेंट आणि ग्लोबल टॅलेंटपर्यत पोहोचण्याच्या कारणांमुळे सर्वोच्च 30 स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये लंडनचा दुसरा नंबर राहिला आहे. हाच नंबर 2012 मध्ये 8 व्या स्थानी होता. सदर स्टार्टअपच्या यादीत जगातील सर्वोच्च कामगिरी असणाऱया शहरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे स्टार्टअप जीनोमचे संस्थापक जेएफ गोथियर यांनी म्हटले आहे.

Related Stories

सप्टेंबरमध्ये इंधन मागणी वाढली

Omkar B

ऑक्टोबर पहिल्या सप्ताहात वीज विक्रीत तेजी

Patil_p

सेलमधील 10 टक्के हिस्सेदारी विकणार

Patil_p

रोजगाराचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये घटले

Patil_p

मसाला विक्रीमध्ये झाली घसरण

Patil_p

शेअर बाजार पहिल्याच दिवशी कोसळला

Patil_p
error: Content is protected !!