तरुण भारत

इचलकरंजीत समूह संसर्ग? 8 पॉझिटिव्ह

जिल्हय़ात नवे 20 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

जिल्हय़ात शुक्रवारी 20 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये इचलकरंजीतील कुडचे मळय़ातील 8 जणांचा समावेश आहे. इचलकरंजीत समूह संसर्गाची शक्यता वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शहर, करवीर तालुक्यातही समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. दरम्यान, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील नव्या रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 1 हजार 833 जणांची तपासणी करून 424 स्वॅब घेण्यात आले. तसेच 276 रिपोर्टपैकी 11 पॉझिटिव्ह आणि 265 निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोरोना बाधितांची संख्या 798 वर पोहोचली आहे.

परजिल्हय़ांतून जिल्हय़ात शुक्रवारी रात्रीपर्यत आलेल्या 1 हजार 833 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 424 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. लक्षणे असलेल्या 120 जणांना आयसोलेटेड केले आहे. रात्रीपर्यत आलेल्या 276 स्वॅब रिपोर्टपैकी 265 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तसेच 11 जण पॉझिटिव्ह आहेत. दिवसभरात फक्त दोघे कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 712 वर पोहोचली आहे.

जिल्हय़ात रात्री 10 वाजेपर्यत आलेल्या 19 पॉझिटिव्ह रूग्णांत शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथील 54 वर्षांचा पुरूष, कोतोली तर्फ सोनारवाडी येथील 55 वर्षीय पुरूष आहे. करवीर तालुक्यातील कणेरी येथील 28 वर्षीय विवाहिता अन् 8 वर्षाची बालिका पॉझिटिव्ह आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथील 62 वर्षीय पुरूष, दुंडगे येथील 32 आणि 35 वर्षीय पुरूष तसेच कौलगे येथील 32 वर्षांच्या पुरूषाचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील आंबवडे येथील 58 वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील 43 वर्षीय पुरूष यामध्ये आहे.

इचलकरंजी शहरातील कुडचे मळा येथील 8 जणांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या परिसरात कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. करवीर तालुक्यातील कणेरी येथे दोन पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले आहेत. शहरात आणखी 1 पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला आहे. पण त्याचे निश्चित ठिकाण मिळालेले नाही. जिल्हय़ात समूह संसर्गाचा धोका वाढल्याची चर्चा आहे.

712 जणांना डिस्चार्ज डॉ. बी. सी. केम्पीपाटील

जिह्यात आजअखेर 781 पॉझिटिव्हपैकी 712 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 59 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी शुक्रवारी दिली.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी : आजरा 78, भुदरगड 74, चंदगड 81, गडहिंग्लज 97, गगनबावडा 6, हातकणंगले 13, कागल 57, करवीर 23, पन्हाळा 27, राधानगरी 68, शाहूवाडी 184, शिरोळ 8, नगरपालिका क्षेत्र 18, महापालिका क्षेत्र 36 असे 770 आणि पुणे 2, सोलापूर 3, मुंबई 2, नाशिक 1, कर्नाटक 2 आणि आंध्र प्रदेश 1 असे इतर जिल्हा, राज्यातील 11 मिळून 781 रुग्ण संख्या आहे. जिह्यातील 781 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 712 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 10 जणांचा मृत्यू झाल्याने उपचारार्थ दाखल झालेल्या जिह्यातील रूग्णांची संख्या 59 इतकी आहे.

‘पॉझिटिव्ह’मध्ये इंजिनिअरींग कॉलेंजमधील अधिकारी

शहरात शुक्रवारी सापडलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी एकजण शहरातील एका प्रसिद्ध असलेल्या इंजिनिअरींग कॉलेजमधील अधिकारी आहे. तो कॉलेजमधील ज्यांच्या संपर्कात आला आहे, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील सर्व महाविद्यालये बंद असून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने मात्र सर्व स्टाफला बोलावून घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Related Stories

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात राजर्षी शाहू शेतकरी आघाडी

Abhijeet Shinde

कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Patil_p

‘ त्या ‘ बाधीत रुग्णाने गावचे नाव सांगितले खोटे, रुग्ण तळसंदेचा असल्याचे स्पष्ट

Abhijeet Shinde

कोल्हापूर : 1586 नवे कोरोना रुग्ण, तर 33 मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूच्या फौंड्री उद्योगाचे भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे निधन

Abhijeet Shinde

आरआयटीची एआयसीटीई-आयडिया लॅबसाठी निवड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!