तरुण भारत

सातारा जिल्ह्याला पुन्हा झटका, 28 अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/सातारा

● बहुतेक जण पुणे – मुंबई चे प्रवासी
● कराडमध्ये सर्वाधिक 13
● कराड शहरातही प्रवेश
● बाधितांच्या आकड्याने ओलांडला 900 चा आकडागेल्या पंधरवड्यात कोरोना बाधितांचा आलेख जरा खालावला होता मात्र तो पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. शुक्रवारी रात्री 3 बाधित सापडले होते तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुनः 28 जण बाधित सापडले आहेत.

या कोरोनाबाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले 6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत.

बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी

*वाई तालुक्यातील(4)* कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,

*खटाव तालुक्यातील(1)* मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,

*सातारा तालुक्यातील(3)* धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,

*खंडाळा तालुक्यातील(2)* शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,

*पाटण तालुक्यातील(1)* उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,

*कराड तालुक्यातील(13)* तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला, चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,

*कोरेगाव तालुक्यातील (1)* नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,

*जावळी तालुक्यातील (3)* रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

*ओलांडला 900 चा आकडा*

Advertisements

या रिपोर्ट मुळे बाधितांच्या आकड्याने 919 चा आकडा गाठला आहे. गेल्या 3 दिवसांत एकूण 60 पेक्षा जास्त बाधित सापडले आहेत.

*उपचार घेणाऱ्यांचा आकडा पुन्हा 183 वर गेला*

गेल्या 15 दिवसांपूर्वी आलेख एकदम खाली आला होता. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या 140 पेक्षा कमी होती. आता ही संख्या 183 झाली आहे.

*टक्केवारी पुन्हा खालावली*

सातारा जिल्ह्यात मुक्त होणाऱ्यांची टक्केवारी समाधानकारक मानली जात होती. गेल्या चार दिवसांत सगळे कोष्टकच मोडले गेले. 919 बाधित तर 699 मुक्त असल्याने मुक्त होणाऱ्यांचा टक्का कमी होत 79 पर्यंत आला आहे.

*बळींचा आकडा ही चिंताजनक*

सातारा जिल्ह्यात एकूण 42 बळी गेले असून राज्यातील मुख्य शहराशिवाय हा आकडा मोठा असल्याचे मानले जात आहे.

Related Stories

MPSC ची १५ हजार ५१५ पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता- अजित पवार

Abhijeet Shinde

फडणवीसांच्या ‘त्या’ मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Abhijeet Shinde

बार्शी येथे झाडांचा वाढदिवस करत जागतिक पर्यावरण दिन साजरा

Abhijeet Shinde

सातारा : कराडजवळ अपघातात हडपसरचे दोघे ठार

Abhijeet Shinde

पेट्रोल – डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

Rohan_P

महाराष्ट्रात मागील 24 तासात 54,535 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!