तरुण भारत

वर्षाअखेरीस भारतात दाखल होणार S-400 मिसाईल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारताला पहिल्या टप्प्यातील S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम रशिया या वर्षाअखेरीस पुरवणार आहे. 

रशिया S-400 हे मिसाईल 2021 पर्यंत भारताला देण्यात येणार होते. मात्र, भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया हे मिसाईल चालू वर्षाअखेरीस भारताला देणार आहे. तसे झाल्यास भारत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये S-400 सहभागी करू शकेल. दोन दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियाने सहमती दर्शवली आहे. 

S-400 हे मिसाईल शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी वापरले जाईल. 2018 मध्ये भारत आणि रशियादरम्यान जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा S-400 साठी 5 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता.

Related Stories

एप्रिलमध्ये सुरू होणार संघाची सैन्यशाळा

Patil_p

फोन टॅपिंगची कबुली, गेहलोत सरकार वादात

Patil_p

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

pradnya p

भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांचा फोन आला; यड्रावकरांचा खुलासा

Shankar_P

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका : अजित पवार

pradnya p

भारत-पाक सीमेवर उस्मानाबादचा तरुण अटकेत

datta jadhav
error: Content is protected !!