तरुण भारत

कोरोनाची धास्ती : झारखंड राज्याने वाढवले 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन

ऑनलाईन टीम / रांची : 


देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. झारखंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने झारखंड सरकारने 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे.

Advertisements


याबाबत झारखंड सरकारने  एक अधिसूचना जारी केली असून त्यात म्हटले आहे की, राज्यात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन असून काही अटी आणि शर्तींसह सूट दिली आहे. मात्र, नियमांचे पालन काटेकोरपणे सुरू राहील असे ही म्हटले आहे.

 
पूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळा, बार, आंतरराज्यीय बससेवा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम, कोचिंग यासह मंदिर, मशिदी, चर्च, संस्थादेखील बंदच राहतील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

ऐनवेळी टेलिप्रॉम्पटर बंद; मोदींचा उडाला गोंधळ

datta jadhav

तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

prashant_c

निवडणुकांच्या राज्यात 80 टक्के लसीकरण करा !

Patil_p

लादेन 9/11च्या हल्ल्यात सहभागी नव्हता ; तालिबानच्या प्रवक्त्याचा दावा

Abhijeet Shinde

दिलासादायक : कोरोनामुक्ती दरात भारत अव्वल स्थानी

Rohan_P

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची दुसरी खेप दाखल

Patil_p
error: Content is protected !!