तरुण भारत

संयुक्त राष्ट्राच्या गाडीत सेक्स, व्हिडिओ व्हायरल

ऑनलाईन टीम / तेल अवीव : 

संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत गाडीत एक अधिकारी महिलेसोबत सेक्स करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इस्रायलची राजधानी तेल अवीव येथील असल्याची माहिती समोर आली असून, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Advertisements

एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ चित्रीत केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राची नाचक्की झाली आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये लाल रंगाच्या कपड्यात एक बाई कारच्या मागील सीटवर एका पुरुषासोबत लैंगिक चाळे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तेल अवीवमधल्या समुद्रकिनाऱ्या लगत चित्रीत करण्यात आला आहे. अवघ्या 18 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही संयुक्त राष्ट्राच्या शांतता संघटनेचा सदस्य आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टॅफेन दुजारिक यांनी हा प्रकार “घृणास्पद” असल्याचे म्हटले आहे. आपल्या कर्मचार्‍यांनी केलेल्या लैंगिक गैरवर्तनाविरूद्ध संयुक्त राष्ट्रांची कठोर धोरणे आहेत आणि या प्रकरणात ती राबविली जातील. या प्रकरणात आरोपीची सुटका होणार नाही. कर्मचार्‍यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संयुक्त राष्ट्र संघ बराच काळ चर्चेत आहे, असेही ते म्हणाले. 

Related Stories

दिल्लीत दिवसभरात 2914 नवे कोरोना रुग्ण, 13 मृत्यू

Rohan_P

चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापणाऱ्या नारायण राणेंना अजित पवारांचं उत्तर

Abhijeet Shinde

ड्रग प्रकरण: फॉरेन्सिक लॅबकडून अभिनेत्रींच्या केसांचे नमुने परत

Abhijeet Shinde

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ राज्य सरकारच्या नजरकैदेत

Abhijeet Shinde

हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Abhijeet Shinde

‘अनलॉक’मुळे ‘कोरोना विस्फोटा’चा धोका

Patil_p
error: Content is protected !!