तरुण भारत

सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी चाहत्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई :


सुशांतसिंह राजपूत याचे निधन होऊन आठवडा उलटून गेला आहे. मात्र, अजूनही या धक्क्यातून त्याचे कुटुंब आणि चाहते सावरले नाही आहेत. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी लाखो चाहत्यांचं प्रेम पाहून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या निर्णयाची घोषणा केली आहे.

Advertisements


या निर्णयानुसार, सुशांतच्या आठवणी आणि सन्मानासाठी त्याच्या कुटुंबाकडून ‘सुशांतसिंह राजपूत फाऊंडेशन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. या फाऊंडेशनद्वारे सुशांतच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच विज्ञान, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या तरुणांना पाठबळ दिले जाईल. तसेच पाटण्यातील राजीव नगर येथील त्याच्या घराचे रुपांतर स्मारकात केले जाणार आहे. तिथे सुशांतच्या वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातील. यामध्ये त्याची पुस्तके, टेलिस्कोप, फ्लाईट सिम्युलेटरसह अनेक गोष्टी ठेवल्या जातील, जेणेकरुन त्याचे चाहते त्याच्यासोबत सदैव जोडलेले राहतील, असे या पोस्ट मध्ये म्हटले आहे. 


दरम्यान, सुशांतचे सोशल मीडियावरील इंस्टाग्राम, ट्विटर अकाउंट देखील सुरू ठेवले जाणार आहे असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. 

Related Stories

“हम दो, हमारे दो” म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Abhijeet Shinde

आसाममध्ये दिसली दुर्लभ पांढरी हरिण

Patil_p

“सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापरला जाणारा देशद्रोहाचा कायदा संपुष्टात आणावा”

Abhijeet Shinde

अभिनेता पूरब कोहली सह पत्नी व मुलांना कोरोनाची लागण

prashant_c

क्रीडा विभागाचे निवृत्त सहसंचालक नरेंद्र सोपल यांचे निधन

Abhijeet Shinde

‘आपण फक्त हाक द्या, मी येतोच..’ : अजय देवगणचे ट्विट

prashant_c
error: Content is protected !!