तरुण भारत

दिल्लीत कोरोनासंबंधी महासर्वेक्षण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात फैलावला आहे हे तपासण्यासाठी सिरो सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात विविध विभागांमधील रक्तनमुने प्राप्त केले जाणार आहेत. रँडम पद्धतीने घरांना निवडून तेथे राहणाऱया लोकांचे रक्तनमुने प्राप्त करून कोरोना चाचणी होणार आहे. 10 जुलैपर्यंत दिल्लीत 20 हजार नमुने घेतले जाणार आहेत. या सर्वेक्षणासाठी विशेष किट पथकाला सोपविण्यात आले आहे. डॉक्टर व्ही.के. पॉल यांच्या समितीच्या शिफारसींनुसार हे सर्वेक्षण होणार आहे.

Advertisements

राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग किती फैलावला, किती लोकांना हा संसर्ग झाला आहे आणि किती जणांच्या शरीरात या विषाणूशी लढण्याची प्रतिरोधकशक्ती विकसित झाली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सर्वांना मिळणार आहेत. दिल्लीत याकरता सीरो सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे.

विशेष किटने चाचणी

चाचणीच्या निष्कर्षांच्या आधारावर कोरोना विरोधात अँटीबॉडीज कशाप्रकारे विकसित होत आहे आणि त्याच्या विकासाचा दर काय आहे हे समजणार आहे. रक्तनमुन्याची चाचणी करून अर्ध्या तासात संबंधित व्यक्तीमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे की नाही हे उमगणार आहे. ही चाचणी एका विशेष किटने पार पाडली जाणार आहे.

20 हजार नमुने

सीरो सर्वेक्षणात पूर्ण दिल्लीमधून सुमारे 20 हजार नमुने प्राप्त केले जाणार आहेत. प्रत्येक जिल्हय़ातून 800 ते 1000 नमुने गोळा केले जातील. या सर्वेक्षणासाठी जिल्हय़ाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकाऱयाच्या देखरेखीत पथके विविध भागांमधील घरांमध्ये जात रँडम पद्धतीने घरांना निवडून तेथे राहणाऱया लोकांचे रक्तनमुने प्राप्त करणार आहेत.

अँटीबॉडीजचा शोध

दिल्लीत कुठल्या भागात किती लोकांना कोरोना संसर्ग झाला आणि ते आपोआप बरे झाले हे या सर्वेक्षणातून पडताळले जाणार आहे. या सर्वेक्षणामुळे विषाणूचा फैलाव आणि त्याची संसर्गक्षमता समजून घेण्यास मदत होईल. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास अशा व्यक्तीच्या शरीरात 5-7 दिवसांमध्ये आपोआप अँटीबॉडी निर्माण होण्यास सुरुवात होते. ही अँटीबॉडी विषाणूचा शरीरात फैलाव होऊ देत नाही.

Related Stories

अमेरिकन कंपनी ‘KKR’ ची ‘जिओ’त 11,367 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

छत्तीसगड : नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत 22 जवान शहीद

datta jadhav

हिमाचल प्रदेश : ‘या’ दिवसापासून सुरू होणार शाळा आणि कॉलेज

pradnya p

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 454 नवे कोरोना रुग्ण; 8 मृत्यू

pradnya p

जामिया विद्यापीठात पुन्हा गोळीबार

prashant_c

”ओळखपत्र नसले तरी रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन घ्यावं लागणार”

triratna
error: Content is protected !!