तरुण भारत

सार्वजनिक स्वच्छतागृहात कोरोनाचा धोका

शक्यतो जाणे टाळा : गरज असल्यास एक व्यक्ती परतल्याच्या एका मिनिटाने प्रवेश करा

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

Advertisements

कोरोना संकट कायम असताना देखील आम्ही घरातून बाहेर पडू लागलो आहोत. अशा स्थितीत मॉल, उद्याने किंवा रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहाचा वापर करण्याची गरजही वारंवार भासत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

स्वच्छतागृह किती संक्रामक?

कुठल्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्याने कोरोनाची बाधा होऊ शकते हे आम्ही जाणतो, परंतु अनेकदा स्वच्छता केल्यावर हात धुण्यापूर्वी ज्या गोष्टींना स्पर्श करतो, त्यांना मायक्रोब्समुळे दूषित करतो. मायक्रोब्स म्हणजेच नोरोव्हायरस आणि ई कोली. स्वच्छतागृहात हवेमुळेही श्वसनाद्वारे शरीरात जाणारे विषाणू म्हणजेच इन्फ्लुएंजामुळे संक्रमित असू शकतात. हवेत मोठय़ा प्रमाणात पार्टिकल्स तरंगत असल्यास श्वास घेणे धोकादायक ठरू शकते. याचे सर्वात उत्तम उदाहरण मीजल्स आहे. मीजल्सने ग्रस्त एखादा व्यक्ती खोलीत केल्यास तेथील हवा 2 तासांपर्यंत धोकादायक राहू शकते.

स्वच्छतागृहात टॉयलेट फ्लूमही धोकादायक आहे. प्रत्येक फ्लशनंतर टॉयलेट हवेत मायक्रोब्सची अदृश्य आर्मी सोडत असते. यानंतर हे मायक्रोब्स भिंत, टॉयलेट सीट, जमीन आणि दाराच्या हँडलला चिकटतात. फ्लश केल्यावर संक्रामक पार्टिकल्स हवेत सुमारे 1 मिनिटापर्यंत तरंगत असल्याचे एका अध्ययनात आढळून आले आहे.

केवळ स्वतःचा विचार करू नका

कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी शौचालयाचा वापर करत असल्यास खबरदारीसह काही जबाबदाऱयाही ध्यानात घ्या. कोरोना महामारीच्या काळात बाथरुम एटिकेट्सही महत्त्वाची भूमिका बजावतील. कुठलेही स्वच्छतागृह वापरत असल्यास केवळ स्वतःचा विचार करू नका. तुमच्यानंतर शौचालयात जाणाऱया लोकांच्याही सुरक्षिततेची काळजी घ्या.

या गोष्टींची खबरदारी घ्या

? स्वच्छतागृहात संसर्गापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग मुखपट्टा आणि पृष्ठभागाला कमीत कमी स्पर्श करणे आहे.

?          मोठय़ा स्वच्छतागृहात जाण्याचा प्रयत्न करा, कारण तेथील एअर सर्क्युलेशन चांगल्या प्रकारचे असते.

?          तुमच्यापूर्वी कुणी स्वच्छतागृहातून बाहेर पडल्यास आत जाण्यापूर्वी किमान 60 सेकंदांची प्रतीक्षा करा.

?          पेपरद्वारे टॉयलेटचे सीट कव्हर तयार करू नका. ते सहजपणे टॉयलेट फ्लूमने दूषित होतात. त्याला स्पर्श संसर्गास कारणीभूत ठरतो.

?          टॉयलेटमध्ये फ्लश ऑटोमॅटिक असल्यास स्प्रेपासून वाचण्यासाठी पावले मागे सरका.

?          हात धुल्यानंतर ते कसे साफ करता याचा फरक पडत नाही, परंतु पुन्हा पुन्हा वापरला जाणाऱया टॉवेलला स्पर्श करू नका.

? स्वच्छतागृहात कमीत कमी वेळ घालवा. बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडावा लागत असल्यास हँड सॅनिटायरचा वापर करा.

Related Stories

पंतप्रधान आज साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

Patil_p

देशात 17.93 लाख सक्रिय रुग्ण

datta jadhav

हज यात्रेसाठी अर्ज केलेल्यांना मिळणार पूर्ण पैसे परत

datta jadhav

उत्तराखंडात गेल्या 24 तासात 831 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांना कोरोनाचा संसर्ग

pradnya p

मुलांच्या लसीची तयारी : लस चाचणीचे निकाल सप्टेंबरपर्यंत येणार

pradnya p
error: Content is protected !!