तरुण भारत

सांगलीत कोरोनाचा १२ वा बळी,नवे १३ रुग्ण

प्रतिनिधी / सांगली

शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचा १२ वा बळी गेला आहे नवीन १३ रुग्ण वाढले आहेत. तर सात जण कोरोना मुक्त झाले आहेत. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील ब्रदर पॉझिटिव्ह आला आहे, तर पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील एक राजकीय नेत्याला कोरोणाची लागण झाली आहे, या दोघांच्या संपर्कातील जवळपास 90 जणांना अलगिकरण केले आहे. सांगली शहरात पुन्हा एकदा कोरोना चा शिरकाव झाला आहे. गाव भागातील आठ वर्षाची बालिका कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे , तर उत्तर शिवाजीनगर येथील गांधी वसाहत मध्ये तिघेजण कोरोनाबाधित आहेत.

जत तालुक्यातील अंकले येथील ६६ वर्षीय व्यक्तीचा उपचार सुरू असताना शनिवारी मृत्यू झाला आहे सदरच्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते हे उपचार सुरू असतानाच ती कोरोनाने मयत झाली आहे. शनिवारी सातजण कोरोना मुक्त झाले यामध्ये शिराळा, निंबवडे, कदम वाडी, मौजे डिग्रज, वायफळे येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे तर मणदूर येथील दोन व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत.

Advertisements

Related Stories

”मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमार यांच्या घरी जाण्यास वेळ मात्र लोणकरच्या आईला भेटायला वेळ नाही”

Abhijeet Shinde

नांद्रेत लस संपल्याने लसीकरण थांबले

Abhijeet Shinde

लॉकडाऊनमध्ये पालिका निवडणूकीसाठी इच्छूकांकडून साखर पेरणी

Patil_p

तहसील कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात

Patil_p

रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाने नांद्रेतील शेतकऱ्यांवर अनेक संकटे

Abhijeet Shinde

दुर्गामातेचे राजधानीसह जिह्यात आगमन

Patil_p
error: Content is protected !!