तरुण भारत

लेवान्डोस्की बुंदेस्लिगा हंगामातील सर्वोत्तम खेळाडू

बर्लिन / वृत्तसंस्था

जागतिक स्तरावरील सर्वोत्तम स्ट्रायकर असलेल्या रॉबर्ट लेवान्डोस्की हा बुंदेस्लिगा हंगामातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. या हंगामात लेवान्डोस्कीने 33 लक्षवेधी गोल साकारले असून वोल्फ्सबर्गविरुद्ध त्याचा आणखी एक सामना बाकी आहे. याशिवाय, त्याने 6 गोलसाठी असिस्टही केले. या योगदानाची दखल घेत त्याला सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान लाभला.

Advertisements

मागील 2-3 हंगामात बायर्न संघाकडे ज्यांचे बारकाईने लक्ष आहे, त्यांना लेवान्डोस्कीच्या शैलीदार खेळाची उत्तम प्रचिती आली आहे. लेवान्डोस्की मिडफिल्डमध्ये खोलवर खेळू शकतो आणि अवघड स्थितीतून मार्ग काढत आघाडीवर आक्रमणे चढवण्यात त्याचा हातखंडा आहे. वर्क रेटच्या निकषावर तो उत्तम ठरला आहे आणि सध्या त्याचा खेळ कारकिर्दीतील सर्वोच्च टप्प्यावर आहे.

Related Stories

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : सेरेना, मरे, मुगुरुझाची विजयी सलामी

Patil_p

आंध्रप्रदेश, झारखंड, विदर्भ विजयी

Patil_p

फुटबॉल हंगामाला ब्रेक : लाखोंची उलाढाल ठप्प

Abhijeet Shinde

उत्तेजक चाचणीत तरणजीत कौर दोषी

Patil_p

मोहन बागान-केरळ ब्लास्टर्स यांच्यात सलामी

Patil_p

केकेआरचा हैदराबादविरुद्ध सफाईदार विजय

Patil_p
error: Content is protected !!