तरुण भारत

कर्तारपूर कॉरिडॉर उद्यापासून सुरू करण्यासाठी पाकचा भारताकडे प्रस्ताव

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

शीख गुरू महाराजा रणजितसिंग यांची उद्या पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर शीख भाविकांसाठी महत्त्वाचा असणारा कर्तारपूर कॉरिडॉर उद्यापासून सुरू करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतापुढे ठेवला आहे.

Advertisements

कर्तारपूर कॉरिडॉर हा गुरूदासपूरमधील डेराबाबा साहिब आणि पाकिस्तानातील कर्तापरपूर साहिब याला जोडतो. नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू झाला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तो 16 मार्चपासून बंद होता. आता जवळपास सर्वच देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. धार्मिक स्थळांनाही परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे बंद असलेला कर्तारपूर कॉरिडॉर उद्यापासून सुरू करण्यात यावा, यासाठी पाकिस्तान आग्रही आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निश्‍चित करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा करावी, असेही पाकने म्हटले आहे. 

Related Stories

व्हिएतनाममध्ये संक्रमणाचा धोका

Patil_p

भारताने दक्षिण कोरियातून मागवले 9.5 लाख रॅपिड टेस्टिंग किट

prashant_c

टिक टॉक वर लाईक्स न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

prashant_c

ट्विटरवर पुन्हा ट्रेंड झाला #DhoniRetires हा शब्द

Rohan_P

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी

Patil_p

देहरादून : जनशताब्दी ट्रेनच्या धडकेने हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!