तरुण भारत

अब्दुल लाट ग्रामस्थांचा घोटाळा चौकशीचा वज्रनिर्धार

वार्ताहर / अब्दुल लाट


जुलै 2019 च्या महापुरात झालेल्या अनुदान वाटपात झालेला महाघोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करून शासनाचा पैसा व्याजासह वसूल करावा, त्यांच्यावर फैाजदारी करावी, दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि फेरसर्व्हे करून अनुदान वाटपात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करावे. या मागणीसाठी शिरोळच्या तहसिलदार कार्यालयासमोर सोमवार दि 29 रोजी ठिय्या मारून चौकशीचा आदेश निघाल्याशिवाय उठायचे नाही. असा वज्रनिर्धार येथील ग्रामस्थांच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला, बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी विकास समितीचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते विद्याधर कुलकर्णी होते.

गावच्या इतिहासात प्रथमच एका प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन लढा उभारल्याचे चित्र पहायला मिळाले. प्रा,संजय परीट यांनी स्वागत करून आंदोलनाची पार्श्वभूमी विशद केली डॉ दशरथ काळे यांनी या आंदोलनाचा इतिहास आणि नेमकी वस्तुस्थिती सांगत यापुढे गावात भ्रष्टाचार करण्याचे धाडस कुणी करू नये यासाठी या आंदोलनाची यशस्वीता महत्वाची असल्याचे सांगून आंदोलन कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळाल्या शिवाय थांबणार नाही, असे जाहीर केले.
माजी जि, प,सदस्य दादासो सांगावे यांनी ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचत ही प्रवृत्ती संपवायला पाहिजे, असे सांगितले. या बैठकीत ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करून प्रसंगी ग्रा,प,बरखास्त करण्याची मागणी केली.

माजी जि प सदस्य आणि जवाहरचे संचालक दादासाहेब सांगावे,,जवाहरचे माजी संचालक जे जे पाटील, शरद चे संचालक एस के पाटील, जिल्हा सूतगिरणी चे संचालक आप्पासो चौगुले, माजी सरपंच श्रीकांत मधाळे, माजी सरपंच संजय पाटील मड्डे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पायगोंड पाटील, दत्ता कारदगे, सुभाष चौधरी, व्यंकटेश्वरा पतसंस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील नांगरे,माजी उपसरपंच सागर सांगावे, भारिप बहुजन महासंघाचे सतीश कुरणे, आर.पी.आय. तालुका अध्यक्ष मारुती मोहिते, ऍड.गिरीश कुलकर्णी, जनता दूध संस्थेचे सचिव बाबुराव परीट, सुधीर सांगावे ,मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अस्लम हरुगिरे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माधुरी ठाकरे, माजी ग्रा.प. सदस्य संजय कोळी कुरपे, भाजपाचे शहराध्यक्ष अतुल मडीवाळ, शिवसेना शहरप्रमुख डॉ,राजेंद्र बैरागी, भास्कर मोहिते, मानवाधिकार समितीचे दादासो कोळी, शिवसेना विभाग प्रमुख महावीर गाडवे, मुस्लिम समाजाचे चांद जमादार , नुरूद्दीन खानापुरे सुधीर सांगावे, सदाशिव कुलकर्णी , शामराव कोळी घटगे, विजय नायकुडे,राजु कुमटोळे, आण्णासो नायकुडे, श्रीकांत कोळी घडसे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सरकारी दवाखान्यात दिव्यांग सेवा केंद्र चालु करणासाठी प्रयत्न करणार

triratna

करवीर तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडी 9 फेब्रुवारीला

triratna

खाजगी प्राथमिक शाळा शिक्षक भरतीसाठी लवकरच निर्णय – मंत्री गायकवाड

triratna

घटस्फोट घोषणेनंतर २४ तासाताच आमिर खान आणि किरण राव आले एकत्र …कसं ते वाचा सविस्तर

triratna

वीर शिवा काशीद यांना अभिवादन ; कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुण्यतिथी साधेपणाने साजरी

triratna

जिल्हाधिकाऱयांनी लुटला कोयना पर्यटनाचा आनंद

Patil_p
error: Content is protected !!