तरुण भारत

अमेरिकेच्या टेक्सास, फ्लोरिडात पुन्हा निर्बंध

ऑनलाईन टीम / ऑस्टिन : 

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अमेरिकेच्या टेक्सास आणि फ्लोरिडात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Advertisements

टेक्सासमधील बारमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच तिथे मास्क आणि सोशल डिस्टन्सचे नियम न पाळले गेल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले. त्यानंतर टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी बार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 100 हून अधिक लोक उपस्थित राहणार असतील, अशा समारंभाला यापुढे प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

तर फ्लोरिडामध्ये बार आणि रेस्टॉरंट या दोन्हींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. टेक्सासप्रमाणेच फ्लोरिडामधील बारमध्ये तरुणांची गर्दी वाढत आहे. तिथेही सोशल डिस्टन्स आणि मास्कचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे बार, रेस्टॉरंट बंद करत मद्यविक्रीही थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि समुद्र किनारे काही काळ बंद ठेवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या मियामी दादे कौंटीचे मेयर कार्लस जिमेनिझ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Related Stories

डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटिव्ह

prashant_c

सौदी बनणार झिरो कार्बन उत्सर्जन करणारा देश

datta jadhav

मेक्सिकोत पुन्हा निर्बंध

datta jadhav

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पक्ष न सोडण्यावर ठाम; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला कायदेशीर नोटीस

Abhijeet Shinde

फिलीपींसमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P
error: Content is protected !!