तरुण भारत

पिंपळगावमध्ये सहा वर्षीय बालिका कोरोना पॉझिटिव्ह

वार्ताहर / पिंपळगाव

भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथील मुंबईहुन आलेल्या एका पोलिसांच्या सहा वर्षीय मुलगीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यामुळे गावात प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बाजारपेठ व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
मुंबईत पोलीस दलात सेवेत असलेल्या एका पोलिसांचे आईवडील व मुलगी मंगळवारी  पिंपळगावमध्ये आले होते. त्या तिघांना घरी होमक्वारंटाईन करण्यात आले होते. स्थानिक दक्षता समितीने त्यांना स्वब तपासणीसाठी गारगोटी येथील कोविड सेंटरमध्ये पाठवले होते. शनिवारी रात्री उशिरा सहा वर्षीय मुलगीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

त्यामुळे मुलगी, आजोबा व आजी या तिघांनाही पुढील उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे.  रविवारी सकाळपासून गावातील बाजारपेठ तसेच एस.टी. स्टँड परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्या कुटुंबियांच्या संपर्कात कोणीही आले नसल्याचे सांगण्यात आले. गावात प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत सर्व दुकाने व व्यवहार बंद राहणार आहेत.

Advertisements

Related Stories

पहिल्या सोनार डोमची मुख्यमंत्र्याहस्ते उद्घाटन

GAURESH SATTARKAR

होय ! गोवा कृषीप्रधान राज्य करतोय : बाबू कवळेकर

Patil_p

अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट

prashant_c

धक्कादायक : रत्नागिरीत एकादिवसात नवे 89 रुग्ण

Abhijeet Shinde

कृषी खात्यातर्फे आता मिशन ‘गावठी भाजी’

Omkar B

प्रतापगंज पेठेतील कंटेंटमेंट झोन उठवणार कधी?

Patil_p
error: Content is protected !!