तरुण भारत

दिल्लीत जगातील सर्वात मोठे कोरोना सेंटर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगातील सर्वात मोठे कोरोना सेंटर (उपचार केंद्र) दिल्ली येथील राधा स्वामी सत्संग व्यास परिसरात तयार करण्यात आले आहे. 10 हजार बेड्स असणाऱया या  केंद्रात सुमारे 1 हजार डॉक्टर्स नियुक्त असतील. लक्षणेयुक्त आणि लक्षणेरहित दोन्ही प्रकारच्या रुग्णांना येथे वेगवेगळे ठेवले जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या केंद्राची पाहणी केली आहे.

Advertisements

दिल्लीच्या छतरपूर भागात हे कोरोना उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. यात 10 हजार बेड्सची सुविधा असून जगाच्या कुठल्याही रुग्णालयात इतकी मोठी सुविधा नाही. केंद्र आणि दिल्ली सरकारने मिळून हे उपचार केंद्र निर्माण केले आहे.

22 फुटबॉल मैदानांएवढा आकार

राधा स्वामी सत्संग व्यासच्या 12,15,000 चौरस फुट क्षेत्रात हे उपचार केंद्र उभे राहिले आहे. सुमारे 22 फुटबॉल मैदानांना एकत्र आणल्यास एवढा आकार होतो. 22 किलोमीटर लांबीच्या भूमिगत केबलद्वारे तेथे विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.

अंतर्गत सुविधा

उपलब्ध माहितीनुसार या केंद्रात 1 हजार डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांचे पथक तैनात असणार आहे. एकूण 10 हजार बेड्सपैकी 1 हजार प्राणवायूसहाय्य सुविधायुक्त असतील. तर उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी 5 हजार पंखे जोडण्यात आले आहेत. तर केंद्रात 5 हजार कमोडची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन हिस्स्यांमध्ये रुग्ण

छतरपूर भागात राधा स्वामी सत्संग व्यासच्या परिसरातील या केंद्रात दोन हिस्से असतील. एका हिस्स्यामध्ये लक्षणेरहित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. तर दुसऱया हिस्स्सयात कोविड आरोग्य देखभाल केंद्र असणार आहे.

आयटीबीपीकडे व्यवस्थापन

राधा स्वामी सत्संग व्यास कोविड केंद्राची जबाबदारी भारत-तिबेट सीमा पोलीस दलाकडे (आयटीबीपी) देण्यात आली आहे. आयटीबीपी एक नोडल संस्था म्हणून काम पाहणार आहे. दिल्लीत आतापर्यंत 80 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील सुमारे 2,500 जणांचा मृत्यू ओढवला आहे.

Related Stories

पंतप्रधान मोदी 8 रेल्वेंचा प्रारंभ करणार

Patil_p

दैनंदिन रुग्णसंख्येने ओलांडला अडीच लाखांचा टप्पा

datta jadhav

संविधान दिनाच्या कार्यक्रमावर 14 विरोधी पक्षांचा बहिष्कार

datta jadhav

4.2 रिश्टर स्केलचा मिझोराममध्ये भूकंप

Patil_p

हरियाणा : सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड, सोबत देणार 5 मास्क

Rohan_P

दहशतवादी हल्ल्यात पाकमध्ये 7 बालके ठार

Patil_p
error: Content is protected !!