तरुण भारत

मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत

एफए चषक फुटबॉल : हॅरी मॅग्वायरचा जादा वेळेतील गोल ठरला निर्णायक

वृत्तसंस्था / नॉर्विच

Advertisements

ओल गुनार सॉल्सकायर यांच्या मँचेस्टर युनायटेड संघाने एफए चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना नॉर्विच सिटीचा 2-1 असा पराभव केला.

या विजयासाठी मँचेस्टर युनायटेडला बराच संघर्ष करावा लागला. जादा वेळेतील अखेरच्या क्षणांत हॅरी मॅग्वायरने निर्णायक गोल नोंदवल्याने त्यांना शेवटच्या चार संघात मिळविता आले. मँचेस्टर युनायटेडला ओडियन इघालोने आघाडी मिळवून दिली. पण टॉड कान्टवेलने गोल नोंदवून नॉर्विचला बरोबरी साधून दिली. 89 व्या मिनिटाला इघालोला पाडवल्याबद्दल डिफेंडर टिम क्लोसला मैदानाबाहेर घालविण्यात आले. त्यामुळे नार्विचला उर्वरित वेळेत 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले. या सामन्यात युनायटेडला हळूहळू नियंत्रण मिळविता आले आणि इंग्लंडचा डिफेंडर असलेल्या मॅग्वायरने मिळालेल्या संधीचा लाभ घेत आपल्या संघाची सर्व स्पर्धांत मिळून अपराजित मालिका 14 सामन्यापर्यंत वाढविली. युनायटेडने 2016 मध्ये एफए चषक जिंकला होता. गेल्या तीन वर्षांत त्यांना दुसऱयांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे. 5 मार्च रोजी पाचव्या फेरीत युनायटेडने डर्बी लढत जिंकली होती. त्यानंतर कोरोना महामारीने या स्पर्धेला ब्रेक देण्यात आला होता. आणि आता जूनमध्ये त्याचे पुनरागमन झाले आहे. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंत सुसंवाद नसल्याचेच दिसून आले. पण 51 व्या मिनिटाला युनायटेडला पहिले यश मिळाले. ल्युक शॉचा क्रॉस जुआन माटामार्फत इघालोकडे आल्यावर त्याने शानदार फ्लिकवर सहा यार्ड बॉक्समधून गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. इघेलोचे आता 11 सामन्यात 5 गोल झाले आहेत. नॉर्विच संघ 1992 नंतर प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळत होता. त्यांनी 75 व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. कान्टवेलने 20 यार्डावरून मारलेला फटका गोलरक्षक सर्जिओ रोमेरोला व्यवस्थित अडविता आला नाही. निर्धारित वेळेच्या शेवटच्या मिनिटाला नॉर्विचला विजयी गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती. पण ब्युनडियाचा फटका गोलपोस्टच्या बाजूने गेल्याने त्यांची ही संधी हुकली. जादा वेळेत 118 व्या मिनिटाला मॅग्वायरने इघालोच्या पासवर गोल नोंदवून युनायटेडचा विजय निश्चित केला

Related Stories

बांगलादेशचा 430 धावांचा डोंगर, मिराजचे शतक

Amit Kulkarni

क्रीडा पत्रकार किशोर भिमानी कालवश

Patil_p

सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!

Patil_p

श्रीलंकेतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा एब्डन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

IndVsAus: टीम इंडियाला मोठा धक्का; मोहम्मद शमी मालिकेबाहेर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!