तरुण भारत

तब्बल 70 नवे रुग्ण, एकूण 717

शारजा, जर्मनीतून 170 प्रवाशांचे आगमन , फातोडर्य़ातील मयत महिलेवर विधीयुक्त अंत्यसंस्कार

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

राज्यात कोरोनाचा कहर आता वाढत चालला आहे. गोव्याच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असूम काल रविवारीही तब्बल 70 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा आता 717 वर पोहोचला आहे. अनेक भागात लोक लॉकडाऊनची मागणी करीत आहेत. काही ठिकाणी स्वेच्छेने लॉकडाऊन करण्यात आले आहे, मात्र लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय नसून लोकांनी आता स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागात आता रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा उद्रेक झालेल्या मांगोरहिलमधील रुग्णसंख्या 258 झाली आहे तर मांगोरहिलसंबंधित कोरोना बाधितांचा आकडा 235 झाला आहे. वास्को भागात रुग्ण वाढत आहेत. सडा वास्को येथे रुग्णसंख्या 61 झाली आहे तर बायणातील रुग्णसंख्या 41, न्युवाडे येथील रुग्णसंख्या 27, झुवारीनगरमधील रुग्णसंख्या 24 झाली आहे.

कुडतरीतील रुग्णसंख्या 31 तर मोर्ले येथील रुग्णसंख्या 22 एवढी आहे. सांखळीतील रुग्णसंख्या वाढत असून रुग्णांचा आकडा 8 वर पोहोचला आहे. आंबेली संबंधितांचा आकडा 25 झाला आहे. केपे 10, लोटली 11, डिचोली 3, काणकोण 5 तर मडगाव नावेली भागात 6 रुग्णांची नोंद झाली आहे. काल रविवारी 58 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने तेवढाच दिलासा मिळासा आहे. आता मडगाव मोती डोंगरावरही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, लॉकडाऊन हा उपाय नव्हे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय नव्हे असे स्पष्टपणे सांगितले आहे. कोरोना बाधितांचा आकडा कमी न होता वाढत आहे. पंचायती, पालिका आपला परिसर लॉकडाऊन करीत आहेत पण सरकार लॉकडाऊन करायला तयार नाही. लोकांनी सामाजिक सुरक्षा पाळावी न प्नाक्षा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच परिसरातील लोकांनी काळजी घ्यावी तरच कोरोनावर नियंत्रण येणार आहे. लोकांनी शेजाऱयांची विचारपूस करण्यासाठी जाऊ नये. अगोदर लॉकडाऊन केले कारण लोकांमध्ये जागृती होण्याची गरज होती. साधन-सुविधा निर्माण होण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.

जीवनावश्यक वस्तू नसल्याने वास्कोत तणाव

जीवनावश्यक वस्तूंचे योग्य वाटप होत नसल्याच्या निषेधार्थ मांगोरहिलमधील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱयांच्या भेटीची मागणी केली. त्यामुळे या वस्तीत काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून संबंधीत अधिकाऱयांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला.

 शारजा, जर्मनीतून 170 प्रवाशांचे आगमन

शनिवारी रात्री शारजा व जर्मनीतील 179 हवाई प्रवाशांचे गोव्यात आगमन झाले. हे सर्व प्रवासी भारतीय असून ते लॉकडॉऊनमुळे विदेशात अडकले होते. या सर्व हवाई प्रवाशांना कदंब बसमधून दक्षिण व उत्तर गोव्यातील हॉटेल्समध्ये कॉरन्टाईनसाठी पाठविण्यात आले.  

मास्क न वापरणाऱयास आजपासून एक दिवसाची कैद

म्हापसा

आज सोमवारपासून तोंडावर मास्क  परिधान  न  करणाऱयांना एक दिवसाची  कैद देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

 ते म्हणाले की राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. कोरोना विरोधात लढा देत असतानाच त्यावर आळा घालण्यासाठी आतापर्यंत अनेक नियम अंमलात आणलेले आहेत. दुदैवाने त्या कायद्यांचे पालन लोकांकडून होताना दिसत नाही, त्यामुळे आजपासून तोंडावर मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱया लोकांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी  आज सोमवारपासून करण्यात येणार असून मास्क परिधान न करणाऱयांना एक  दिवसाची कैद देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. म्हापशातील हुतात्मा चौकात रोटरी क्लबच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. …माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती नाजूक

राज्याचे माजी आरोग्यमंत्री सद्या मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. काल रविवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना पूर्वीच मूत्रपिंडाचा आजार आहे, त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक बनल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली. राज्यात काल रविवारी तब्बल 70 नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून राज्यातील सक्रीय रग्णांचा आकडा 717 वर पोहोचला आहे.

शनिवारी त्यांच्या पत्नीला व मुलीला देखील याच इस्पितळात उपचारासाठी आणले आहे. जेव्हा त्यांची हॉस्पिटलमध्ये गाठभेट झाली, त्यावेळी माजी आरोग्यमंत्री भावूक झाले. आपल्या पत्नीला व कन्येला पाहून ते गहिवरले. तिघांनाही कोरोनाचा संसर्ग व त्यात तिघेही सिम्प्टोमेटिक असल्याने तिघांवरही कोविड इस्पितळात सद्या उपचार सुरू आहेत.

कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात तिघांवर उपचार सुरू असून त्यात माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती नाजूक आहे तर अन्य दोघांची प्रकृती स्थिर आहे. सद्या कोविड हॉस्पिटलमध्ये वयस्क रूग्ण जास्त प्रमाणात येत असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर तसेच नर्सेस विशेष लक्ष ठेऊन आहेत. कोविडमुळे मृत्यू आलेल्या

महिलेचे मडगावात दफन

मडगाव

चंद्रावाडो-फातोर्डा येथील 76 वर्षीय महिलेला शनिवारी रात्री मडगावच्या कोविड हॉस्पिटलात मृत्यू आला. कोविडमुळे मृत्यू आलेली ही तिसरी व्यक्ती होती. रविवारी दुपारी मडगावच्या होली स्पिरीट चर्चच्या दफनभूमीत तिचे दफन करण्यात आले. यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच दोन धर्मगुरू, मयत महिलेची एक नातेवाईक तसेच दफनभूमीत विधी करणारी व्यक्ती अशी चार जणांची उपस्थिती होती.

मयत महिलेचे पार्थिव कोविड हॉस्पिटलातून सरळ दफनभूमीत आणले गेले. पार्थिव शववाहिकेतून दफनभूमीत नेण्यात कोविड हॉस्पिटलच्या कर्मचाऱयांनी मदत केली. दफनभूमीत दोन धर्मगुरूनी अंतिम प्रार्थना केली. उपस्थित असलेल्या मयत महिलेच्या जवळच्या नातेवाईकाला अश्रू आवरता आले नाही.

रेजिनाल्डची उपस्थिती इतरांना आदर्श ठरणारी

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या जवळपास कुणी जात नाही. कारण संसर्ग इतरांना होण्याची भीती असते. एखादी व्यक्ती दगावली तर अंत्यसंस्काराला कुणी जात नाही. मात्र, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी चंद्रावाडो-फातोर्डा येथील या महिलेवर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार होतील याची काळजी घेतली. त्यांनीच डॉक्टरांकडे बोलणी केली नंतर दफनभूमीत उर्वरित सोपस्कार पूर्ण करण्यास पुढाकार घेतानाच त्या महिलेला अखेरचा निरोप देण्यासाठी जातीने दफनभूमीत उपस्थित राहिले. संकटसमयी अशी मदत करण्याचा आदर्श त्यांनी इतर राजकीय नेत्यांना घालून दिला आहे.

डॉक्टराचे मार्गदर्शन ठरले महत्वाचे

कोविडमुळे मृत्यू आलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात काही मार्गदर्शन तत्वे घालून दिलेली आहेत. चंद्रावाडो-फातोर्डा येथील महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोविड हॉस्पिटलचे डॉक्टर एडविन गोम्स व हॉस्पिसियो इस्पितळाच्या डॉक्टर इरा आल्मेदा यांनी मार्गदर्शन केले. कोविडमुळे मृत्यू आलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. माणुसकीची भावना जोपासताना, धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यास सांगितल्याची माहिती यावेळी फा. ऑलिड्रीन डिकॉस्ता यांनी दिली.

आपण कृतीतून संदेश दिलाय

कोविडमुळे एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला तरी घाबरून जायचे कारण नाही. आपण स्वतः दफनभूमीत उपस्थित राहू शकतो तर इतरांनी देखील अंत्यसंस्काराच्यावेळी उपस्थित राहण्यास कोणतीच हरकत नसल्याचा संदेश आपण लोकांना दिला असल्याचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले.

आम्ही जर मयत व्यक्तीचा आदर केला नाही तर देवापर्यंत चांगला संदेश जाणार नाही. आपण आपले कर्तव्य केले आहे. गोव्यातील तमाम जनतेला आपण एकच संदेश देतो की, कोणत्याही धर्मातील व्यक्ती मयत झालेली असल्यास तिला साजेसा निरोप द्या. देवाने आम्हाला एक गोष्ट शिकवलीय जीवनात चांगले केल्यास नक्कीच त्याचे चांगले फळ मिळते तसेच देवावर विश्वास ठेवा कुणाला काहीच होणार नाही, असे ते शेवटी म्हणाले.

Related Stories

स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसाठी उपोषण करणार

Amit Kulkarni

डिचोली अबकारी खात्यातर्फे सुमारे 4.50 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त.

Omkar B

चोपडे येथील मासळी मार्केट आजपासून बंद करण्याचा पंचायतीचा निर्णय

Omkar B

म्हादईसाठी 26 रोजी खांडेपार येथे कलश मिरवणूक

Patil_p

खराब हवामानामुळे मच्छीमारी लांबणीवर

Amit Kulkarni

दोड्डा गणेशचा गोवा रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Amit Kulkarni
error: Content is protected !!