तरुण भारत

जागेअभावी 220 केव्ही स्टेशनचे काम रखडले

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव विभागाला 220 केव्ही विजेचे स्टेशन मंजूर होऊन वर्ष उलटले तरी अद्याप त्यासाठी जागा मिळालेली नाही. देसूर-नंदिहळ्ळी भागामध्ये हे स्टेशन उभारले जाणार आहे. परंतु इतकी मोठी सरकारी जागा या परिसरात उपलब्ध नाही. खासगी जागांच्या किमती जास्त असल्यामुळे जागेअभावी स्टेशनचे काम   रखडत चालले आहे.

बेळगाव शहर व तालुक्मयाला हिंडाल्को येथील 220 केव्ही स्टेशनमधून वीजपुरवठा करण्यात येतो. धारवाड येथून आलेल्या विजेच्या वाहिन्या थेट हिंडाल्को येथे आल्या आहेत. तेथून शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु या वीजकेंद्रात बिघाड झाल्यास संपूर्ण शहराचा वीजपुरवठा ठप्प होतो. मागील आठवडय़ात असाच प्रकार झाल्याने तीन तास संपूर्ण शहर व तालुक्मयाचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. असे प्रकार घडू नयेत यासाठी तालुक्मयाच्या दक्षिण भागात असणाऱया देसूर परिसरात एक स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. एका वीजकेंद्रात बिघाड झाल्यास दुसऱया वीजकेंद्रातून पुरवठा केला जावू शकतो.

सध्या जागेचा शोध सुरू आहे. परंतु योग्य जागा अद्याप मिळालेली नाही. या परिसरात इतकी मोठी सरकारी जागा उपलब्ध नसल्यामुळे खासगी जागेची पाहणी करण्यात येत आहे. या परिसरात शेतजमीन मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे खडकाळ जमीन उपलब्ध नाही. यामुळे या वीजकेंद्राचे काम दिवसेंदिवस रखडत चालले आहे.

नव्या जागेसाठी प्रयत्न : चिकार्डे

देसूर परिसरात 220 केव्ही विजेचे केंद्र मंजूर झाले आहे. यासाठी देसूर- नंदीहळ्ळी परिसरात जागेचा शोध सुरू होता. यरमाळ येथे असलेल्या खासगी जागेची पाहणी करण्यात आली होती. परंतु कागदपत्रे पूर्ण नसल्याने ती देखील रद्द करण्यात आली. त्यामुळे नव्या जागेची पाहणी करण्यात येत असल्याचे हेस्कॉमचे कार्यकारी (ग्रामीण) अभियंते प्रवीणकुमार चिकार्डे यांनी सांगितले.

Related Stories

‘स्त्री हा कुटुंबाचा चेहरा’ मानणाऱया डॉ. निरंजना महांतशेट्टी

Omkar B

काँग्रेस शेतकऱ्याची दिशाभूल करत आहे

Patil_p

देव आले…देव आले..अन् सारे पीक खाऊन गेले!

Omkar B

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती

Patil_p

रामदुर्ग येथे बेकायदा सागवान जप्त

Patil_p

विविध मागण्यांकरिता बँक कर्मचाऱयांचा संप

Patil_p
error: Content is protected !!