तरुण भारत

पाच महिन्यात चिनी उद्योगाचा नफा 19 टक्क्मयांनी घसरला

कोविड19 चा प्रभाव : चीनच्या एनबीएसच्या अहवालात माहिती सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या कोविड आणि लॉकडाऊन यांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे जगभरातील उद्योगधंदे मोठय़ा आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. यात नफा आणि तोटय़ाचा प्रवास सध्या सुरु झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये 2020 च्या पहिल्या पाच महिन्यात म्हणजे जानेवारी ते मे च्या दरम्यान चीनच्या मुख्य उद्योगातील कंपन्यांचा नफा 19.3 टक्क्मयांनी घसरला आहे तर ही घसरण कोविड19 च्या कारणामुळे झाल्याची माहिती चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिक्सकडून(एनबीएस)सांगण्यात आली आहे. सदर आकडेवारीच्या आधारे याच काळात चीनच्या उद्योगाचा नफा हा जवळपास 19 लाख कोटी रुपयांवर राहिल्याचे स्पष्ट केले आहे.

2020 या वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमधील नफा हा 22 टक्क्मयांनी नुकसानीत राहिला असल्याचा अंदाज मांडला आहे तर 21 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा वार्षिक महसूल असणाऱया संस्था व कंपन्यांच्या आर्थिक उलाढालीचे आकडे अभ्यासात घेऊन हा अंदाज बांधला असल्याचे एनबीएसने म्हटले आहे. सदरचे सर्वेक्षण करण्यासाठी एनबीएसने एकूण 41 क्षेत्रांचा समावेश करुन घेतला होता. यातील 30 क्षेत्रातील नफ्यात घसरण झाली आहे तर 1 क्षेत्राचा फक्त नफा स्थिर आहे.

प्रमुख क्षेत्राचा समावेश

सर्वाधिक प्रभावीत झालेल्या क्षेत्रात ऑईल, कोळसा आणि अन्य इंधन कंपन्यांचा नफा 167.4 टक्के आहे. तसेच वाहन आणि कापड क्षेत्रातही 33.5 ते 10.3 टक्के नफा घसरला आहे. दुसऱया बाजूला मात्र इलेक्ट्रॉनिक उपकरण बनविणाऱया कंपन्यांचा नफा 34.7 टक्के तंबाखू 28.1 टक्के आणि शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचा नफा 19 टक्क्मयांनी वाढल्याची माहिती एनबीएसच्या सांख्यिकी विभागाने दिली आहे.

Related Stories

एल ऍण्ड टी नुकसानीत

Patil_p

शेअर बाजारात पुन्हा घसरणीची नोंद

Patil_p

तेलाच्या ऐतिहासिक घसरणीने बाजार कोसळला

Patil_p

शेअर बाजाराची वधाराने आठवडय़ाची सांगता

Patil_p

‘कोरोना कवच’ आरोग्य विमा पॉलिसी उतरविताना

Omkar B

अशोक लेलँडची व्हीआरएस योजना

Omkar B
error: Content is protected !!