तरुण भारत

ढाका येथील नदीत नौका बुडाली, 28 बळी

कित्येक बेपत्ता : बूढीगंगा नदीतील दुर्घटना

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisements

बांगलादेशची राजधानी ढाका शहरानजीक बूढीगंगा नदीत नौका बुडाल्याने किमान 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या नौकेतून 100 पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. आतापर्यंत 28 मृतदेह हाती लागले आहेत. काही प्रवाशांनी पोहून काठावर धाव घेत जीव वाचविला आहे. किती जण वाचले आणि किती बेपत्ता आहेत याची माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ही दुर्घटना नौका अन्य नौकेला धडकल्याने घडली आहे.

ढाक्यानजीक श्यामबाजारमध्ये सोमवारी सकाळी 9.30 वाजता दुर्घटना घडली आहे. मॉर्निंग बर्ड नावाची नौका मुंशीगंज येथून ढाक्याच्या दिशेने प्रवास करत होती. सदरघाट टर्मिनलनजीक त्याची मोयूर-2 नावाच्या नौकेशी टक्कर झाली. या दुर्घटनेत मॉर्निंग बर्ड नौका बुडाली आहे. आतापर्यंत 18 पुरुष, 7 महिला आणि 3 मुलांचे मृतदेह पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.

या मृतदेहांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. मदत तसेच बचावकार्य सुरू असून नौदल, तटरक्षक दलाचे पथक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्यात सामील झाले आहेत.

बांगलादेशात नदीपात्रातून प्रवासी वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. कोरोना संकटातही नौकेवर 100 हून अधिक जण प्रवासी असल्याने उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Related Stories

बायडेन यांची योजना

Patil_p

अस्थमाच्या रुग्णांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी

Omkar B

रशियातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले

Patil_p

जगातील सामर्थ्यवान महिलांमध्ये एंजेला मार्केल प्रथम स्थानी

datta jadhav

चिनी राजदूताचा नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप

Patil_p

पाकची नाचक्की! दक्षिण कोरियात दुतावासांनी केली चोरी

datta jadhav
error: Content is protected !!