तरुण भारत

बेंजामिन मेंडीची भारताला भेट देण्याची इच्छा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

इंग्लंडमधील प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटी क्लब संघातील बचावफळीत खेळणारा फ्रान्सचा 25 वर्षीय फुटबॉलपटू बेंजामिन मेंडीने नजिकच्या भविष्यकाळात भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

भारतातील ईपीएल क्लबच्या फुटबॉल शौकिनांकडून आपण निमंत्रणाची वाट पाहत असल्याचे मेंडीने स्टार स्पोर्टस् चॅनेलशी बोलताना सांगितले. भारताबद्दल मला अधिक आकर्षण वाटते. या सुंदर देशाला भेट देण्याची माझी इच्छा असून ही लवकर पूर्ण होईल, अशी आशा मेंडीने व्यक्त केली. कोरोना महामारी संकटामुळे तूर्ताला भारताला भेट देणे शक्य वाटत नाही. संपूर्ण भारतात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली असल्याने भारताला भेट देण्यास विलंब होईल, असे वाटते. 2017 च्या जुलै महिन्यात मेंडीबरोबर मँचेस्टर सिटी क्लबने पाच वर्षांच्या कालावधीसाठी करार केला आहे. फ्रान्सचा फुटबॉलपटू मेंडी याला दुखापतीमुळे सहा महिने फुटबॉलपासून अलिप्त रहावे लागले होते. 2018-19 च्या फुटबॉल हंगामात मेंडीने प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत पहिल्या बारापैकी 10 सामन्यांत मँचेस्टर सिटीचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

रॉबिन उत्थप्पाचेही पुनरागमनाचे लक्ष्य

Patil_p

रोहित बहरात नसेल तर त्याचा निश्चितच लाभ घेऊ : शिखर धवन

Omkar B

कर्नाटकातील मुली भारतीय महिला क्रिकेट संघात

Shankar_P

इलावेनिल, बजरंग वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू

Omkar B

सायकलींग सराव शिबिराला दिल्लीत प्रारंभ

Patil_p

खो-खो मध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व

Patil_p
error: Content is protected !!