तरुण भारत

टेनिस स्पर्धेसाठी दोन हजार शौकिनांना परवानगी

वृत्तसंस्था/ प्राग

झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या नव्या टेनिस स्पर्धेसाठी सुमारे दोन हजार टेनिस शौकिनांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.

Advertisements

या स्पर्धेसंदर्भात झेकच्या आघाडीच्या टेनिसपटूंशी स्पर्धा आयोजकांनी चर्चा केली आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱया टेनिस शौकिनांकरिता मोबाईल स्टँडस् तयार केले जाणार आहेत. या स्टँडची क्षमता दोन हजार शौकिनांसाठी ठेवण्यात येईल, असे स्पर्धा आयोजन समितीचे संचालक डेव्हिड ट्रूनेडा यांनी सांगितले. या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या अव्वल महिला टेनिसपटू सहभागी होणार असून त्यामध्ये क्विटोव्हा, प्लिसकोव्हा यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने कोरोना संकटामुळे आपल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडमधील विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली तर प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारी संकटानंतर डब्ल्यूटीए टूरवरील पहिली टेनिस स्पर्धा 3 ऑगस्टपासून पार्लेमो येथे खेळविली जाईल.

Related Stories

आयएसएलची कोलकाता डर्बी एटीकेने ईस्ट बंगालला नमवून जिंकली

Patil_p

ओसाकाचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त

Patil_p

फिलँडरच्या भावाची हत्या

Patil_p

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

Patil_p

डायमंड लीग स्पर्धा लांबणीवर

Patil_p

चिंकी यादव, राही सरनोबद, मनू भाकर यांचा सुवर्णवेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!