तरुण भारत

नापोलीचा सलग पाचवा विजय

वृत्तसंस्था/ रोम

सिरी ए फुटबॉल स्पर्धेत नापोली फुटबॉल संघाने आपला सलग पाचवा विजय नोंदविला. रविवारी झालेल्या सामन्यात नापोलीने स्पेलचा 3-1 अशा गुण फरकाने पराभव केला.

Advertisements

या विजयामुळे नापोली संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 28 सामन्यांतून 45 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. रविवारच्या सामन्यात नापोली संघातर्फे मर्टन्स, जोस मारिया कॅलेजोन आणि अमीन युनीस यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पेलतर्फे एकमेव गोल पेटागेनाने केला. या स्पर्धेत ए.एस. रोमा संघ गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहे. रोमा संघाने 48 गुण नोंदविले आहेत. या स्पर्धेत रविवारी झालेल्या अन्य एका सामन्यात एसी मिलान संघाने एएस रोमाचा 2-0 असा पराभव केला.

Related Stories

ट्रेनिंगच्या खर्चासाठी दुती चंदचा ‘सेडान’ विकण्याचा निर्णय

Patil_p

राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेत मजूर महिला गंभीर जखमी

triratna

हैदराबादसमोर पराभवाची श्रृंखला खंडित करण्याचे आव्हान

Patil_p

चेतेश्वर पुजाराऐवजी रोहित शर्मा उपकर्णधार

Patil_p

अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा टेनिसला निरोप

Patil_p

बेंगलोर एफसीने साधली नॉर्थईस्टशी बरोबरी

Omkar B
error: Content is protected !!