तरुण भारत

क्लब क्रिकेटपटू संजय डोबाल यांचे कोरोनामुळे निधन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे सुप्रसिद्ध क्लब क्रिकेटपटू व दिल्ली यू-23 संघाच्या साहायक स्टाफमधील माजी सदस्य संजय डोबाल यांचे सोमवारी कोव्हिड 19 च्या बाधेमुळे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबाच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले. ते 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

Advertisements

मोठा मुलगा सिद्धांत राजस्थानतर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळत असून त्यांचा धाकटा मुलगा एकांशने दिल्ली यू-23 संघात पदार्पण केले आहे. ‘एका आठवडय़ापूर्वी डोबाल यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना प्रथम बहादुरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणीत त्यांना कोव्हिड 19 विषाणूंची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावत गेल्याने पुढील उपचारासाठी चांगली सुविधा असलेल्या द्वारका हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. त्यांना प्लाजमा थेरपीचे उपचारही देण्यात आले. पण त्याचा काहीही उपयोग न होता त्यांचे सोमवारी निधन झाले,’ असे डीडीसीएच्या पदाधिकाऱयाने सांगितले.

फिरोज शहा कोटला मैदानावर सर्वपरिचित असलेले डोबाल दिल्लीच्या अनेक नामवंत क्रिकेटपटूंमध्ये लोकप्रिय होते. त्यात सेहवाग, गौतम गंभीर, मिथुन मनहास यांचा समावेश आहे. त्यांनी सॉनेट क्लब या सुप्रसिद्ध क्लबचे प्रतिनिधित्व केले. तारक सिन्हा हे त्यांचे प्रशिक्षक होते. गंभीर व मनहास यांनी ट्विटरच्या माध्यमातून डोबाल यांच्यासाठी प्लाजमा देण्याचे आवाहन केले होते आणि आपचे आमदार दिलीप पांडे यांनी प्लाजमा दात्याची सोयही केली होती. ते रणजी स्पर्धेत खेळले नसले तरी एअर इंडिया संघातून खेळणे थांबवल्यानंतर त्यांनी कनिष्ठ क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य केले आहे. मागील दशकात भारत व इंग्लंड महिलांची कसोटी जामिया येथे झाली होती, त्यावेळी भारतीय महिला संघाचे स्थानिक व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. बीसीसीआयचे माजी कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना, माजी क्रिकेटपटू मदन लाल व मिथुन मनहास यांनी डोबाल यांना आदरांजली वाहिली.

Related Stories

इंग्लंड कसोटी संघात नवोदित बेसला संधी

Patil_p

झगडणाऱ्या पंजाब किंग्ससमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

Amit Kulkarni

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यजमानपदासाठी अमेरिका उत्सुक

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघ ओमानला रवाना

Patil_p

बार्टीला पराभवाचा धक्का

Patil_p

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

Patil_p
error: Content is protected !!