तरुण भारत

महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी 5 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / मुंबई  : 


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत 5 हजाराने वाढ झाली. सोमवारी एका दिवसात 5257 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 181 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

Advertisements


सोमवारी नोंद झालेल्या 181 मृत्यूंपैकी 78 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. अन्य 103 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 4.48 टक्के आहे. तर राज्यात एकूण 73 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 43 हजार 485 नमुन्यांपैकी 1 लाख 69 हजार 883 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 93 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 37 हजार 758 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी एकूण 2 हजार 385 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.37 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 88 हजार 960 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Related Stories

मोदींना उद्देशून ममतादीदींची वादग्रस्त टिप्पणी

Patil_p

जडेजाच्या घोंघावलेल्या वादळात आरसीबी नेस्तनाबूत!

Patil_p

बिहार : लॉकडाऊन हटविले; पण नाईट कर्फ्यू अजूनही जारी : नितीश कुमार

pradnya p

दिल्ली हिंसाचार प्रकरण ; दीप सिद्धूला जामीन

triratna

दहावी, बारावी परीक्षांसाठी आजपासून अर्ज

pradnya p

वन्यप्राण्यांमध्येही कोरोना संक्रमणाचा धोका

Patil_p
error: Content is protected !!