तरुण भारत

अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मूकाश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांना यश आले. 

अनंतनागच्या वाघमा परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. 

दरम्यान, सोमवारी अनंतनागमधील खुलचोहर भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले होते. 

Related Stories

सीआरपीएफ ताफ्यावरील हल्ल्यात दोघांना वीरमरण

Amit Kulkarni

शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी प्रक्षेपण

datta jadhav

पाँडिचेरीत काँग्रेस सरकार अल्पमतात

Patil_p

देशात 45,149 नवे कोरोना रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 79 लाखांवर

datta jadhav

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला मिळणार चालना

Patil_p

गिरीश मुर्मू यांनी स्विकारला कैगचे महालेखाकर म्हणून कार्यभार

pradnya p
error: Content is protected !!