तरुण भारत

कबनूर ग्रामपंचायतच्या बेकायदेशीर कामाची चौकशी करावी : शिवसेना

वार्ताहर / कबनूर

कबनूर ग्रामपंचायतमध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर कामांची संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार हातकणंगले गटविकास अधिकारी अरुण जाधव यांच्याकडे शिवसेना शाखा कबनूर यांच्यावतीने दाखल करण्यात आले.

Advertisements

कबनूर येथील ग्रामपंचायतीमध्ये चाललेला प्रशासकीय कारभार हा योग्य पद्धतीने होत नसून सर्व कामात अंदाधुंदी चालू असल्याचे दिसून येत आहे. याकडे ग्रामपंचायत हेतुपुरस्करपणे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या सदस्यांची मुदत आठ ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामाचा सपाटा सुरू ठेवला आहे. काही वाढीव बिले, न केलेल्या कामांची बिले उचलली जात असल्याचा संशय आहे. या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतमधील एका सदस्यांनी प्रोसिडिंग बुक घरी नेऊन संगनमताने काही ठराव, करार व इतर नोंदी घातल्या आहेत याची पडताळणी करणे हे कृत्य नियमबाह्य असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

मागील दोन वर्षातील घरफाळा वसुली ही ग्रामपंचायत बँक खात्यावर जमा न करता परस्पर काही बेकायदेशीर कामे दाखवून ती रक्कम लाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमा नोंदीची चौकशी करण्यात यावी. जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत गळती व दुरुस्ती करणे, पाईपलाईन बदलणे, मोटर दुरुस्ती, पॅनल बदलणे व अन्य कामावर वारंवार काढणे या नोंदींवर खर्च दाखविले आहेत.

ग्रामपंचायत फर्निचर कामी वाढीव कामास मंजुरी नसतानाही बोगस ठराव करून काम दाखवून पैसे उचल करण्याची शक्यता आहे. सध्या गावात कचरा डेपो नसताना कचरा प्रकल्प डेपो दाखवून लाखो रुपयाचे मशीन आणण्याचा बेकायदेशीर ठराव करून मशिनरी खरेदी करण्याची शक्यता आहे. अशा बेकायदेशीर ठराव खर्चाची मंजुरी घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण याची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी असे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेले आहे. शिवसेना शाखा कबनूरच्यावतीने नुकतीच हातकणंगले तालुका गट विकास अधिकारी अरुण जाधव यांची भेट घेऊन त्यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कबनूर शिवसेना शहरप्रमुख प्रशांत जगताप, हातकणंगले तालूका शिवसेना प्रमुख आनंदा शेट्टी, युवा सेना प्रमुख भरत पवार हातकणंगले उपतालुकाप्रमुख रवी धनगर उपशहर प्रमुख सुनील नरदेकर, कबनूर उपशहर प्रमुख यशवंत चव्हाण
युवासेना कबनूर शहर प्रमुख विजय हजारे, महिला शिवसेना शहरप्रमुख मधुमती खराडे, कबनूर महिला उपशहरप्रमुख संगीता यादव, शाम हावळकर, दिग्विजय इंगवले,विनायक पोवार,सागर कोले, दिपक येजरे,ऋषीकेश चव्हाण, सचिन गोंडबाळ,आकाश चौगुले,जितेंद्र यादव यांच्या या तक्रार अर्जावर सह्या आहेत.

Related Stories

कोल्हापूर : दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर गोकुळ शिरगाव कचरामुक्त

Abhijeet Shinde

साताऱयात आजपासून आरटीपीसीआर लॅब

Patil_p

भाजप आमदार मंदा म्हात्रेंचा पक्षाला घरचा आहेर, म्हणाल्या…

Abhijeet Shinde

जयसिंगपूर शहरासाठी १०० बेडचे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करणार

Abhijeet Shinde

भाजप खासदाराच्या सुनेवर अत्याचार; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने ट्वीट केला व्हिडीओ

Abhijeet Shinde

गोकुळ लुटलेल्यांशी तडजोड नाहीच : सतेज पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!