तरुण भारत

‘नमो ॲप’वर पण बंदी घाला : पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


केंद्र सरकारने चीनी 59 ॲप वर बंदी घातली आहे. त्यानंतर आता ‘नमो ॲप’वर बंदी घाला अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे आज केली आहे. 

Advertisements


पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.#BanNaMoApp हा हॅशटॅगही त्यांनी ट्रेंड केला आहे.

दरम्यान, सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्रानं 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय झाला. भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

‘जंगल बस सफारी’ने अभयारण्यातील पर्यटनाला चालना मिळेल: पालकमंत्री

Abhijeet Shinde

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी एसओपी करा

Rohan_P

तहाव्वूर राणाचा जामीन अर्ज अमेरिकन न्यायालयाने फेटाळला

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जी यांची घोषणा

Abhijeet Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता जनतेशी साधणार संवाद

prashant_c

…तर भारतात दिवसाला 14 लाख कोरोना रुग्ण आढळतील

datta jadhav
error: Content is protected !!