तरुण भारत

आमिर खानच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. विशेषतः मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यातच आता अभिनेता आमिर खान यांच्या स्टाफमधील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आमिर खानने स्वतः याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 

Advertisements


आमिर खानने आपल्या इंस्टाग्राम नोटमध्ये माझ्या काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि कोरोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे खूप आभार मानतो.


उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझी चाचणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या आईला कोरोना चाचणीसाठी घेऊन जात आहे. तिचाही रिपोर्ट निगेटीव्ह येऊ दे अशी प्रार्थना करा. त्वरित आणि काळजीपूर्वक उपाय केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन या रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. कोरोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली.


दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मागील 24 तासात 18 हजार 522 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5 लाख 66 हजार 840 वर पोहचली असून, मृतांची संख्या 16 हजार 893 इतकी आहे.

Related Stories

वाराणसी – जौनपुर हायवेवर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू; 10 जखमी

Rohan_P

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्तीचा निर्णय रद्द ; अजित पवारांचा आदेश

Abhijeet Shinde

देशातील कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav

थरारक अनुभूती देणारा भयपट काळ

Patil_p

इंग्लंडमधून भारतात पोहचले व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

datta jadhav

मोदींनी इंधनाचीही शंभरी साजरी करावी

datta jadhav
error: Content is protected !!