तरुण भारत

संपूर्ण वीजबिल एकत्र भरल्यास 2 टक्के सूट : नितीन राऊत यांची घोषणा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


लॉक डाऊनच्या काळात वाढलेले वीज बिल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेत एक मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण वीजबिल एकत्र भरल्यास दोन टक्के सूट दिली जाईल असे म्हटले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 

Advertisements


ते म्हणाले, लॉक डाऊनच्या काळात ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले आहे. सध्या मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापरा नुसार एप्रिल व मे महिन्यासह जून महिन्याचे एकत्रित बिल दिले जात आहे. या वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम दूर करण्यासाठी ग्राहक निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. 


लॉक डाऊनच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे.  त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

पुढे ते म्हणाले, ग्राहकांना थकीत वीज बिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा दिली जात आहे. तसेच ज्या ग्राहकांनी या अगोदरच संपूर्ण रक्कमेचे वीज बिल भरले आहे, त्यांना देखील दोन टक्के सूट दिली जाणार आहे.  तसेच ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्यांच्या मदतीसाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता क्षेत्रीय कार्यालयात मदत केंद्रात नेमण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

कोरोना मानसिक रोग, राज्य शासनाला कवडीची अक्कल नाही : संभाजी भिडे

Abhijeet Shinde

देशात कोरोना फैलाव थांबेना; गेल्या २४ तासांत २२,७७५ नवे कोरोना रुग्ण

Sumit Tambekar

पतंजलीचे ‘कोरोनिल’ 3 दिवसात करते रुग्ण बरा : बाबा रामदेव

datta jadhav

अमरावती जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन : जिल्हाधिकारी

Rohan_P

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आढळले दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’

Abhijeet Shinde

अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का

Patil_p
error: Content is protected !!