तरुण भारत

खोरनिनको धरणाच्या जलसेतूचे काम प्रगती पथावर!

प्रतिनिधी  / लांजा 

मानवनिर्मित धबधब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खोरनिनको धरणातील पाणी वाहून नेण्यासाठी एका जलसेतूच्या उभारणीचे काम प्रगती पथावर आहे. हा पारंपरिक कालवा पद्धतीस नवा पर्याय असून पाटबंधारे अभियंता यांचे यासाठी कौतुक होत आहे. लांजा तालुक्याला भूषणावह असलेल्या खोरनिनको धरणातून 1407 हेक्टर जमीन सिंचन 6 क्षेत्रात येणार आहे. जलसेतूची लांबी 405.50 मीटर आहे. 

Advertisements

  हा जलसेतू सह्याद्री घाटाच्या पायथ्याशी असल्याने धरण परिसर आणि मानवनिर्मित धबधबा यामुळे खोरनिनको गावात जणू रेल्वेमार्ग सेतू असल्याचा भास होतो. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एच. सलगर, लांजा उपविभाग क्र 2 चे व्ही. एम. शिंदे, शाखा अभियंता शिवा सावळगी या अभियंत्यांच्या देखरेखीखाली हा कालवा प्रकल्प साकारला जात आहे. तालुक्यातील मुचकुंदी नदीवर खोरनिनको गावात धरण वसले आहे. या धरणाची कमाल उंची 61.87 मीटर आणि लांबी 427 मीटर आहे. उपयुक्त साठा 23.22 दलघमी तर पाणलोट क्षेत्र 14.03 चौ. किमी आहे. कालवा लांबी उजवा तिर कालवा 28.50 किमी तर डावा तीर कालवा 16.83 किमी आहे. या कालव्यातून खोरनिनको, प्रभानवल्ली, बनखोर, गोविळ, कोरले, वेरवली बुद्रुक, खुर्द, भांबेड, पालू या गावात सिंचन क्षेत्रासाठी पाणी मिळणार आहे.

  जलसेतू ही पाटबंधारे विभागाची अतिशय उत्तम किफायतशीर नवीन पद्धत आहे. या पध्दतीने पाण्याचा होणारा अपव्यय कमी होणार आहे. पाण्याचे वहन जलदगतीने होणार आहे. खोरनिनको धरण जलसेतूचे डिझाईन नाशिक दिंडोरी पाटबंधारे स्थापत्य चित्रशाळा तंत्रज्ञ यानी साकारले आहे. याच जलसेतूच्या धर्तीवर अर्जुना पाटबंधारे प्रकल्पात 900 मीटर लांबीचा जलसेतू पाटबंधारे बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सलगर आणि उपविभाग लांजा यांच्या माध्यमातून साकारला आहे. लांजाचे सावळगी आणि शिंदे यांचे खोरनिनको धरण जलसेतू उभारणी कामात महत्वपूर्ण योगदान आहे.

.

Related Stories

अखेर तीन दिवसानंतर मनसे चे आमरण उपोषण मागे

Abhijeet Shinde

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना सिंधुमित्र सेवा सहयोगचा मदतीचा हात

Ganeshprasad Gogate

पाच हजारपेक्षा जास्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा राष्ट्रीय विक्रम

Abhijeet Shinde

मंदिरावर चोरटय़ांचा डल्ला!

Omkar B

गांजा प्रकरणात युवकांचा सहभाग चिंताजनक

NIKHIL_N

गोव्यात सिंधुदुर्गातील रुग्णासाठी गोव्यातील युवकांचे रक्तदान

NIKHIL_N
error: Content is protected !!