तरुण भारत

भुतानमधील सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

भूतान आणि चीनच्या सीमेवर असणाऱ्या सकतेंग अभयारण्याच्या जमिनीवर आता चीनने दावा केला आहे. चीनने या अभयारण्याची जमीन वादग्रस्त असल्याचे सांगत ग्लोबल एन्व्हायरनमेंट फॅसिलिटी काऊन्सिलकडून होणाऱ्या निधी पुरवठ्याला विरोध दर्शविला आहे.

Advertisements

सकतेंग अभयारण्य भूतान आणि चीनच्या सीमेलगत आहे. या ठिकाणी भूतान आणि चीनच्या सीमेची आखणी अजून झालेली नसल्याने चीनने अभयारण्याची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. भुतानाने चीनचा हा दावा झुगारून लावला आहे.

ग्लोबल एन्व्हायरनमेंट फॅसिलिटी काऊन्सिलच्या 58 व्या बैठकीत चीनने सकतेंग वन्यजीव अभयारण्यावर दावा सांगितला आहे. या अभयारण्यासाठी यापूर्वी कधीही, कुठूनही निधी आला नव्हता. पहिल्यांदाच अभयारण्यासाठी निधी येत असल्याने चीनने यावर दावा केला आहे. काऊन्सिलने मात्र चीनच्या विरोधानंतरही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 

Related Stories

नेपाळमध्ये संसद बरखास्त; एप्रिलमध्ये मध्यावधी निवडणुका

datta jadhav

‘क्राईम पेट्रोल’ मधील लोकप्रिय अभिनेते शफीक अन्सारी यांचे निधन

Rohan_P

कोरोनाने मृत्यू झाल्यास किमान 1800 रुपये पेन्शन

Patil_p

भारताचे डब्ल्यूएचओकडून कौतुक

Patil_p

प. बंगाल, आसाममध्ये आज पहिला टप्पा

Patil_p

एलईटी, जैश अन् पाक सैन्यामुळेच सरशी

Patil_p
error: Content is protected !!