तरुण भारत

कोल्हापूर : वाढीव वीजबिले कमी करुन द्या

प्रतिनिधी / कोल्हापूर

वाढीव विजबिले पूर्वीप्रमाणे “प्रती महिना करुन द्यावित” म्हणून आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आर. के. नगर व मोरेवाडी येथे MSEB कार्यालयात आंदोलन केले. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या तीन महिन्यापासून आधीच लॉकडाउन व त्या अनुषंगाने आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेले आर. के. नगर व मोरेवाडी परिसरातील चुकीच्या पद्धतीने आलेल्या वाढीव लाईट बिलाच्या समस्येने हवालदील झालेल्या नागरिकांचे निवेदन आज कार्यकारी अभियंता विठ्ठल चौगुले यांना देऊन वाढीव वीजबिलासंबंधी तातडीने खुलासा करावा व विज बिले दुरुस्त करुन मिळावित म्हणून सर्वाची बिले परत देत. तीन महीन्याची एकत्रित आलेली बिले प्रती महिना करुन द्यावित असे सांगितले.

Advertisements

या चुकीच्या पद्धतीने काढलेल्या बिलांवर योग्य तो मार्ग काढावा नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश हुन्नुरे, दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष अदित्य भाट, कार्याध्यक्ष अथर्व साळुंखे, जिल्हा सरचिटणीस मुस्ताक देसाई, आकाश साबळे व भागातील नागरिक उपस्थित होते

Related Stories

कोल्हापूर : मराठा समाजाला मान्य असा पर्याय काढा

triratna

पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात टॉपवर

triratna

राजू शेट्टी पूरग्रस्त दौऱ्यावर

triratna

शिरोलीत सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी आढावा बैठक पार पडली

Shankar_P

सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

triratna

बाहुबलीमध्ये गुरुदेव समंतभद्रजी महाराज जयंती उत्साहात

triratna
error: Content is protected !!