तरुण भारत

बल्लारीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णांचे मृतदेह फेकले खड्ड्यात

बेंगळूर /प्रतिनिधी


कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाबाधितांचे शव अयोग्यरित्या दफन केल्याच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकाच खड्ड्यात 8 शव दफन केल्याचे दिसत आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एका उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

व्हिडीओमध्ये, PPE किट घातलेले कर्मचारी जवळच उभ्या असलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते एका मागोमाग एक आठ मृतदेह एक मोठ्या खड्ड्यात टाकत होते. यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणार्‍या व्यक्तीनं असा दावा केला की ही घटना बल्लारी जिल्ह्यातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मृतांना अशी वागणूक का दिली जात आहे? असा सवाल विचारला जात आहे. तर, काहींनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisements

Related Stories

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

Patil_p

मंथन सोसायटीतर्फे 2 रोजी ‘मधुरभेट’ कार्यक्रम

Patil_p

जगदीश शेट्टर यांनी घेतला कोरोनाबाबतचा आढावा

Amit Kulkarni

‘ओ दूर के मुसाफीर’मधून उलगडले दिलीपकुमार

Amit Kulkarni

मेगा लोकअदालत 14-16 ऑगस्ट रोजी

Amit Kulkarni

शॉटकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमीचे सुयश

Amit Kulkarni
error: Content is protected !!