तरुण भारत

मास्क न घातल्याने बल्गेरियाच्या पंतप्रधानांना 174 डॉलरचा दंड

ऑनलाईन टीम / सोफिया : 

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने बल्गेरियाचे पंतप्रधान बोयको बोरिसोव्ह यांना 174 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 13 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बल्गेरियाच्या आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. असे असतानाही बोरिसोव्ह एका सरकारी दौऱ्यादरम्यान विना मास्क चर्चमध्ये गेले.

बोरिसोव्ह हे बल्गेरियातील सर्वात मोठ्या ईस्टर्न ऑर्थोडॉक्स रिला चर्चमध्ये सरकार दौऱ्यावर गेले होते. सोफीया पासून 70 मैल दक्षिणमध्ये रिला माउंटेनवर हे चर्च आहे. या चर्चमध्ये बोरिसोव्ह यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मास्क घातले नव्हते.मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाचे फोटो लोकल मीडियाने प्रसिध्द केले. त्यानंतर आरोग्य विभागाने बोरिसोव्ह यांच्यासह सर्वांना दंड आकारला. 

मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक 2.0 बद्दल बोलताना बोरिसोव्ह यांचे उदाहरण देत देशवासियांना नियमांचे पालन करण्याबाबत सांगितले. 

Related Stories

रशियात साडीमध्ये हिंडतेय तापसी

Patil_p

रमजान मुबारक! मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

prashant_c

डाळभात नव्हे भिंतींचा चुना खाते महिला

Amit Kulkarni

बारावीच्या निकालासाठीचे निकष २ आठवड्यामध्ये सांगा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Abhijeet Shinde

कार्यालयीन कामासह जगाची सैर

Patil_p

सीडीसीचे आवाहन

Patil_p
error: Content is protected !!