तरुण भारत

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 77 पोलिसांना कोरोनाची बाधा; एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 77 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली तर एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत  1015 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 60 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. 

Advertisements


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


राज्यात सध्या 1015 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 121 ऑफिसर आणि 894 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंतच्या मृत्यूंमध्ये 3 ऑफिसर आणि 57 कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबरला

datta jadhav

इंधनाचे दर एप्रिलपासून घटणार?

Patil_p

नक्षल समर्थक भाजप नेत्यासह दोघांना अटक

datta jadhav

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण

pradnya p

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

pradnya p

अर्मेनिया-अझरबैजान लढाईत 23 ठार, 100 हून अधिक जखमी

datta jadhav
error: Content is protected !!