तरुण भारत

गहू खरेदीत 13.7 टक्क्मयांची वाढ

सरकारी गोदामात साठा वाढून 38.83 दशलक्ष टनावर

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

देशातील शेतकऱयांकडून नवीन हंगामामधील गहू खरेदी एक वर्षाच्या कालावधीत 13.7 टक्क्मयांनी वाढली आहे. यामध्ये सरकारी भंडारांमध्ये साठा वाढला आहे. हा साठा आता 38.83 दशलक्ष टनावर पोहोचला आहे. मागील दहा वर्षापासून या गोदामाची क्षमता पूर्ण होत आली आहे.

सरकारच्या माहितीनुसार भारतीय खाद्य निगमने (एफसीआय) राज्याकडून निश्वित करण्यात आलेल्या गॅरेंटी मूल्यावर शेतकऱयांकडून विक्रमी अशा 38.83 दशलक्ष टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षात एफसीआयने 34.13 दशलक्ष टन गक्हाची खरेदी केली होती. सरकारच्या गहू खरेदी कार्यक्रमाची देखरेख करणाऱया अधिकाऱयांनी दिलेल्या एका माहितीमधून चालू वर्षात 40.5 ते 40 दशलक्ष टन खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. 2012 मध्ये एफसीआयने नवीन विक्रम नोंदवत 38.18 दशलक्ष टन गहू खरेदी केला होता.

गहू खरेदीच्या या सदर विक्रमाने सरकारसमोर समस्या निर्माण झाली होती. गव्हाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात 35 डॉलरपेक्षा अधिक झाल्या आहेत. यामुळे गव्हाची निर्यात करण्यातही अडचणी निर्माण होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

उत्पादनाचे ध्येय

चालू वर्षात देशामध्ये गव्हाचे उत्पादन 107.18 दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षात 103.60 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन झाले होते.

Related Stories

टाटा पॉवरचा गुजरातेत प्रकल्प

Patil_p

जगात पाचपैकी चारजण लॉकडाउनमुळे प्रभावीत

Patil_p

भारती एअरटेलमध्ये गुंतवणुकीस ऍमेझॉन उत्सुक

Patil_p

रिलायन्सच्या तिमाही अहवालाबाबत उत्सुकता

Patil_p

व्होडाफोन-आयडियाचीस्थिती नाजूक

Patil_p

आयपीओंमधून 2 लाख कोटी उभारणार ?

Patil_p
error: Content is protected !!