तरुण भारत

एस्कॉर्ट्स ट्रक्टर्सच्या विक्रीत 21 टक्के वाढ

जूनमधील विक्रीचे आकडे सादर : मागील जूनच्या तुलनेत तेजी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोविडच्या संकटात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा शेती क्षेत्राचा राहिलेला आहे. यामध्ये कृषी उपकरण आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी एस्कॉर्ट्स लिमिटेडच्या ट्रक्टर्सची जून महिन्यात एकूण विक्री 21.1 टक्क्मयांनी वाढून 10,851 वर राहिली आहे. एस्कॉर्ट्सकडून शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये मागील वर्षाच्या समान महिन्यात ही विक्री 8,960 इतकी झाली असल्याचा उल्लेख आहे.

मे महिन्याच्या दरम्यान देशातील टॅक्टर्सची विक्री 10,623 इतकी झाली आहे. हा आकडा मागील वर्षातील समान कालावधीत 8,648 वर राहिला होता. परंतु जूनमध्ये निर्यात 26.9 टक्क्मयांनी घसरुन 228 वर स्थिरावली आहे, अशी माहिती  कंपनीने समीक्षेच्या आधारे दिली आहे.

दुसऱया बाजूला एका माहितीनुसार एमजी मोटारची जूनमध्ये 2,012 वाहनांची विक्री झाली असल्याचे कंपनीचे विक्री विभागाचे संचालक राकेश सिदाना यांनी म्हटले आहे. याच कालावधीत जूनमध्ये विक्री समाधानकारक राहिली आहे.

Related Stories

कृषी उत्पादनांच्या मागणीत वाढ

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टी वधारत नव्या उंचीवर

Patil_p

म्युच्युअल फंडातून 10 हजार कोटी काढले

Patil_p

जिओमध्ये गुंतवणुकीचा ओघ : अबुधाबी इनवेस्टमेंटसोबत आठवा करार

Patil_p

‘ओला’च्या कारखान्यात लवकरच उत्पादन सुरू

Amit Kulkarni

इन्फोसिस करणार गाइडव्हीजनचे अधिग्रहण

Patil_p
error: Content is protected !!