तरुण भारत

आर्थिक वर्ष 2019-20 व्होडाफोन आयडियाला विक्रमी तोटा

वृत्तसंस्था/ मुंबई

देशातील तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 73,878 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. देशातील आतापर्यंत इतका मोठा तोटा कोणत्याही कंपनीला झालेला नाही. त्यामुळे हा आकडा विक्रमी असल्याची नोंद करण्यात आली आहे.

इतक्मया मोठय़ा प्रमाणात तोटा होण्याचे कारण कंपनीला एजीआय थकबाकी जमा करण्याच्या प्रक्रियेमुळे झाला असल्याचे सांगितले जाते. कारण कंपनीवर 51,400 कोटी रुपयांची एजीआरची थकबाकी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एजीआर थकबाकीची दिशा निश्चित करण्यात आली आणि सदरची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. या दरम्यान 51,400 कोटींची थकबाकी एजीआरच्या रुपाने जमा करावी लागणार आहे. या देवाणघेवाणीच्या काळात कंपनीचे कामकाज सुरु राहणार आहे.

मार्च तिमाहीच्या दरम्यान व्होडाफोन आयडियाचा निक्वळ तोटा 11,643.5 कोटींवर राहिला आहे जो एक वर्षापूर्वी समान कालावधीच्या तिमाहीत 4,881.9 कोटींच्या घरात राहिला होता.

एजीआर संदर्भात सर्वेच्च न्यायालयात जुलैच्या तिसऱया आठवडय़ात सुनावणी होणार आहे. त्यामुळे याच कालावधीत कंपनी उद्योगाला एक व्यापक स्वरुपात पॅकेजसाठी मागणी करणार आहे. याच्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

4 जी डाटा डाऊनलोड स्पर्धेत

सध्या कंपनी आपल्या बदलत्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामध्ये विविध राज्य, महानगरं आणि मोठय़ा शहरांमध्ये 4 जी नेटवर्क डाटा डाऊनलोड स्पर्धेत टिकून राहण्यासाठी यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्होडाफोन आयडियाने व्यक्त केला आहे.

Related Stories

देशामध्ये 46 अन्न प्रक्रिया प्रकल्पांचा प्रारंभ

Patil_p

‘उडाण’-‘मोकळे आकाश’ दोन्ही धोरणे फसली

Omkar B

एअरटेल, वोडाफोनला झटका

Patil_p

2021 पर्यंत झोमॅटोकडून आयपीओ आणण्याची शक्मयता

Patil_p

मायक्रोसॉफ्ट नोएडामध्ये प्रकल्प उभारणार

Patil_p

आरोग्य संजीवनी विम्यामधून कोरोनावर उपचार : इरडा

Patil_p
error: Content is protected !!