तरुण भारत

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात 63 बाधित

●कराड तालुक्यातील 22 जणांचा समावेश
●एकाचा मृत्यू; एकुण संख्या 46
●जिल्हय़ाची रूग्णसंख्या अकराशेवर


प्रतिनिधी/सातारा

जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरूच असून मध्यंतरी मंदावलेला वेग आता पुन्हा वाढला आहे. बाधितांचे आकडे वाढतच असून जिल्हय़ात मृत्यू होणारांचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी दिवसभरात 63 जण बाधित आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालात कराड तालुक्यात 22 जण बाधित असून हॉट स्पॉट कराडमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

*सकाळी 48 बाधितांचा धक्का*

मंगळवारी रात्रीचा अहवाल प्राप्त झाला. यात निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आयएलआय 1 असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला.
यामध्ये *कराड* तालुक्यातील (22) जणांचा समावेश आहे. महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.

*कराडमध्ये भयकंप*

कराड शहरात आरोग्यकर्मींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर बाधित बरे झाल्याने शहर 22 मे रोजी कोरोनामुक्त झाले होते. मात्र 27 जूनला कराडमध्ये शनिवार पेठेतील एक वृद्ध पॉझिटिव्ह आला. त्याच्या हाय रिस्कमधील पाच जणांना बाधा झाली असून रूक्मिणीनगरमधील एक युवक बाधित झाला आहे. त्यामुळे शहरात आज एका दिवसात सहा रूग्णांची वाढ झाली.

कराड तालुक्यात अनेक गावातील साखळय़ा तोडण्यात प्रशासनाला यश आले असले तरी परगावहून येणाऱया लोकांमुळे नवी गावे बाधित होत आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत कराड तालुक्यात एकुण रूग्णसंख्या 341, बरे झालेले 218, उपचार घेणारे 119 व मृत्यू 6 असे प्रमाण होते. कोरोनामुक्त झालेल्या मलकापुरातही पुन्हा रूग्ण वाढले आहेत.

*पाटणमध्ये आठ वाढले*

बुधवारी *पाटण* तालुक्यात नव्याने आणखी सात कोरोना बाधित रूग्नग्ण सापडल्याने आता एकुण संख्या 108 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत यापैकी 63 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे तर यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 39 रूग्नग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात नवसरी येथील 36 वर्षे महिला, 17 व 15 वर्षे युवक, सडादाढोली येथील 36 वर्षे महिला व 4 व 12 वर्षीय मुली, पाळेकरवाडी येथील 1 पुरूष अशा एकुण सात व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सायंकाळी एकाची भर पडली.

याशिवाय *सातारा* तालुक्यातील (2) नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष. *माण* तालुक्यातील(1) खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष. *खटाव* तालुक्यातील(3) निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष. *कोरेगाव* तालुक्यातील(1) करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका. *खंडाळा* तालुक्यातील(6) शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला. *फलटण* तालुक्यातील(5) कुरवली येथील 4 वर्षीय बालक, *कोरेगाव* येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष. *जावळी* तालुक्यातील (1) मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले.

*सायंकाळच्या अहवालात 14 पॉझिटिव्ह*

सायंकाळी आलेल्या अहवालात जिह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय 2 असे एकुण 14 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आहे. तसेच आज 3 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *पाटण* तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष. *खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला. *माण* तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष. म्हसवड येथील 65, 50, 27 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी. *वाई* तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

*तीन जणांना आज डिस्चार्ज*

सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 50, कृष्णा मेडिकल 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 30, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 असे एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

*जांभ येथील बाधिताचा मृत्यू, एकुण संख्या 46*

आज पहाटे कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील 33 वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

*जिल्हय़ात बुधवारी*

एकुण बाधित 63
एकुण मुक्त 3
मृत्यू 01

*जिल्हय़ात बुधवारपर्यंत*

एकुण बाधित 1108
एकुण मुक्त 743
एकुण मृत्यू 46


Related Stories

सातारा : रासाटीच्या महिला सरपंचसह पतीला दहा हजाराची लाच घेताना अटक

Abhijeet Shinde

बेवारस वाहने घेवून जाण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

Patil_p

West Bengal Election 2021 Result Live: नंदीग्राममध्ये अद्याप मतमोजणी सुरु – ममता बॅनर्जींनी ट्वीट करत दिली माहिती

datta jadhav

न्यायव्यवस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळावे

Patil_p

सातारा : दूध दरासाठी भाजपचे आंदोलन

Abhijeet Shinde

अलिशान कार चोरणारी टोळी जेरबंद;पाच कोटींच्या 31 कार हस्तगत

Sumit Tambekar
error: Content is protected !!