तरुण भारत

कोरोनिलच्या विक्रीला सशर्त अनुमती

वृत्तसंस्था/ हरिद्वार

कोरोनिल या आयुर्वेदिक औषधाच्या विक्रीवर बंदी नसल्याचा दावा पतंलजीने बुधवारी केला आहे.  आयुष मंत्रालयाने कोरोनिलच्या विक्रीवर कुठलीच बंदी घातलेली नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले. पतंजलीने अलिकडेच कोरोनावरील उपचारासाठी हे औषध सादर केले होते. परंतु वाद उभा ठाकल्यावर पतंजलीने हे कोरोनावरील औषध नसून आजाराचे व्यवस्थापन करणारे उत्पादन असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisements

पतंजली या औषधाची विक्री करू शकत असले तरीही त्याला कोरोनाच्या उपचाराचे औषध म्हणता येणार नसल्याचे आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे औषध विकण्याची अनुमती देण्यात आली आहे. कोविड-19 च्या उपचारात उपयुक्त ठरणारे औषध म्हणून त्याला अनुमती मिळालेली नाही. पतंजलीने कोरोना महामारी रोखण्याच्या दृष्टीने चांगले काम केले आहे. कोरोनिल तसेच अन्य औषधांचा वापर करू पाहणाऱया लोकांना त्याची खरेदी करता येणार आहे. देशात कोरोनिलचे कीट कुठेही उपलब्ध हाणार आहे. पतंजली कोरोनिलसह आणखीन दोन उत्पादने सादर करत असल्याचे बाबा रामदेव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Related Stories

वैद्यकीय अभ्यासक्रमात आरक्षण घोषित

Amit Kulkarni

‘त्यां’ना करायचा होता 1993 स्टाईल ऍटॅक

Amit Kulkarni

हिवाळय़ात रुग्णांची ओळख पटविणे अवघड

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 4,525 नवीन कोरोना रुग्ण; 340 मृत्यू

Rohan_P

गेल्या 24 तासात 1 हजार 211 रुग्णांना कोरोनाची लागण

prashant_c

दिल्लीत दिवसभरात 123 नवे रुग्ण, 4 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!