तरुण भारत

मानवी रक्षा व भाजीपाल्याच्या कचऱयापासून खत निर्मिती..!

शहरात असलेल्या तीन भाजी मंडईत दररोज कचरा तयार होतो. भाजीपाल्याच्या ओल्या कचऱयापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्यासाठी सातारा पालिकेने युनियन भाजी मंडईत पाठीमागे पीठ तयार केले आहेत. येथील खत निर्मितीचे काम हे सर्व श्रमिक कचरा वेचक संघाच्यावतीने केले जाते. त्यांना नेहमीच प्रयोगशील पर्यावरणप्रेमी विजय निंबाळकर यांचे मार्गदर्शन राहिले आहे. आता नव्याने बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या सहकार्याने मानवी रक्षा-भाजीपाल्याचा कचरा यातून खत निर्मिती केली जात आहे. कैलास स्मशानभूमीचे एक पाऊल पर्यावरणाच्या दृष्टीने टाकण्यात यश आले आहे. तयार झाले खत हे झाडांना चांगलेच उपयोगी ठरत आहे. हा प्रयोग देशात पहिलाच असावा असा दावा सर्व श्रमिक कचरा वेचक संघाचे अध्यक्ष शशिकांत भिसे यांनी केला आहे.

पर्यावरणाचा वाढता ऱहास होत असलेले पाहून शहरात दररोज तयार होणाऱया भाजीपाल्याच्या कचऱयापासून सेंद्रीय खत निर्मिती व्हावी याकरता सातारा पालिकेने 2017 मध्ये आठ पीट तयार केले आहेत. युनियन भाजी मंडई आणि महात्मा फुले भाजी मंडईत असे पीट आहेत. त्यापैकी युनियन भाजी मंडई येथे सेंद्रीय खत निर्मिती केली जात आहे. ही खत निर्मिती करताना सातारा शहरातील भाजी मंडईतमध्ये जो भाजीपाल्याचा ओला कचरा आहे. त्या कचऱयातून सेंद्रीय खत तयार केले जात आहे. आता त्यातच कैलास स्मशानभूमीतल्या मानवी रक्षेचा वापर केला जावू लागला आहे. या रक्षेमुळे चांगल्या प्रतिचे खत तयार होत आहे. तयार झालेले खत हे नजिकच श्रमिक कचरा वेचक संघाच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या बागेतल्या झाडांना वापरले जाते. हा खत प्रकल्प देशात पहिलाच असावा, असा दावा सर्व श्रमिक संघाच्यावतीने केला आहे. पर्यावरणप्रेमी विजय निंबाळकर यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे.

Advertisements

खत प्रकल्पाला यश आले

सेंद्रीय खत प्रकल्प 2017 पासून सुरु केला आहे. आतापर्यंत भाजीपाल्याच्या कचऱयाला सुकवण्यासाठी मातीचा वापर करत होतो. आता रक्षेचा वापर करत आहोत. भाजीपाल्याच्या ओल्या कचऱयातून रक्षा पाणी खेचते. भाजीपाल्याचा कचरा लवकर सुचकतो. लवकर खत तयार होते. रक्षा आणि भाजीपाल्याच्या कचऱयापासून  चांगल्या प्रकारचे खत तयार होते.

शशिकांत भिसे सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष

प्रदुषण टाळले जाते

सर्व श्रमिक कचरा वेचक संघ जेथे खत निर्मिती करतात. त्या केंद्राला रक्षा मोफत दिली जाते. यातून समाजकार्य करा, आम्हाला आऊटपूट काही नको, अशी आम्ही विनंती केली आहे. खत निर्माण करुन झाडांना देतात. एक वेगळाच प्रयोग आहे. शेण्या वापरुन आपण झाड वाचवली. रक्षा पाण्यात न टाकता प्रदूषण टाळले. एकमेव कैलास स्मशानभूमी आपल्याला पहायला मिळेल.

राजेंद्र चोरगे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक

Related Stories

कटू अनुभवामुळेच आम्ही वेळीच सावध झालो !

Abhijeet Shinde

पालिकेच्या फॉगिंग मशीन धुळखात

datta jadhav

“घोषणाबहाद्दर” मंत्री वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा : आमदार पडळकर

Abhijeet Shinde

सांगली : सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी केला एव्हरेस्ट सर

Abhijeet Shinde

हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शीद यांनी दिले स्पष्टीकरण…

Sumit Tambekar

कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन; प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!