तरुण भारत

भारतात मागील 24 तासात 19,148 नवे कोरोना रुग्ण, 434 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


भारतात मागील 24 तासात 19 हजार 148 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 6 लाख 04 हजार 641 वर पोहचली असून, मृतांची संख्या 17 हजार 834 एवढी आहे.


सध्या देशात 2 लाख 26 हजार 947 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 59 हजार 860 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 298 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 89 हजार 802, तामिळनाडूत 94 हजार 049, गुजरातमध्ये 33 हजार 232, मध्यप्रदेश 13 हजार 861, आंध्र प्रदेश 15 हजार 252, बिहार 10 हजार 249, राजस्थान 18 हजार 312, उत्तरप्रदेश 24 हजार 056 तर पश्चिम बंगालमध्ये 19 हजार 170 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांना कोरोनाचा संसर्ग

pradnya p

रिव्हर्स रेपो आणि रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही : शक्तिकांत दास

pradnya p

भारतात 44,489 नवे कोरोना रुग्ण; 524 मृत्यू

pradnya p

‘या’ राज्यांत आजपासून शाळा सुरू

pradnya p

सरन्यायाधीशांच्या विरोधात नेपाळमध्ये उग्र निदर्शने

Patil_p

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!