तरुण भारत

५२ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी १८ रुग्णालयांना नोटीस

बेंगळूर/प्रतिनिधी


बेंगळूरमध्ये एका ५२ वर्षीय व्यक्तीवर 18 खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांनी उपचार करण्यास करण्यास नकार दिला. या व्यक्तीचा मृत्यू झाल्यांनतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांनी बेंगळूरमधील या 18 खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांना या व्यक्तीवर उपचार करण्यास का नकार दिला याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या व्यक्तीचा इन्फ्लूएन्झासदृश आजाराच्या लक्षणांमुळे निधन झाले असल्याचे निष्पन्न झाले. भावरलाल सुजानी असे या व्यक्तीचे नाव असून यांना २७ आणि २८ जून दरम्यान विविध रुग्णालयात उपचारासाठी प्रवेश नाकारल्यांनंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

कमिशनर पंकजकुमार पांडे यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, १८ रुग्णालयांनी प्रवेश नाकारल्यामुळे सुजानी आत्महत्या केली … त्यांचा मुलगा विक्रम जैन आणि पुतण्या दिनेश यांनी नमूद केले आहे की, भावरलाल यांना शनिवारी दि. २७ आणि रविवारी दि. २८ जून रोजी काही रुग्णालयात दाखल करण्यात येत होते परंतु बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याच्या बहाण्याने त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करून घेतले नाही.

” कोणतीही खाजगी वैद्यकीय संस्था “कोविड १ ९ सारखी लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार नाकारू शकत नाहीत” असे अधिसूचनेत अधोरेखित केले आहे.

Advertisements

Related Stories

स्मार्ट बसथांबा हरवला अंधारात

Amit Kulkarni

महिला विद्यालयात बक्षीस वितरण सोहळा

Omkar B

वडगाव मंगाईदेवी आवारात रेणुकादेवी प्रतिकृती दर्शन सोहळा

Patil_p

अतिवाड फाटय़ावर वाहनधारकांची कसून चौकशी

Amit Kulkarni

हनुमान नगर येथे मंदिरात चोरी

Patil_p

दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!