तरुण भारत

चिंताजनक! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे तब्बल 52 हजार रुग्ण  

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत कोरोनाचे थैमान अजूनही सुरुच आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत तब्बल 52 हजार नवे रुग्णांची नोंद झाली. अमेरिकेत कोरोना रुग्णांचा एका दिवसांतला हा उच्चांकी आकडा आहे. याबाबतची आकडेवारी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.

Advertisements


गेल्या 24 तासांत 52 हजार 898 नवे रुग्ण आढळून आल्याने अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 26 लाख 82 हजार 270 वर पोहोचला आहे. तसेच एका दिवसात 706 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1 लाख 28 हजार 28 इतकी झाली आहे.


अमेरिकेत दरदिवशी सुमारे 40 हजार रुग्ण आढळून येत होते. याआधी एका दिवशी 42 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे.
दरम्यान, जगातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 8 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 5 लाख 18 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 59 लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत.


अमेरिकेपाठोपाठ ब्राझिलमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 14 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मृतांचा आकडा 60 हजारांवर पोहोचला आहे.

Related Stories

फिनलंड जगातील सर्वात आनंदी देश

Patil_p

धोका वाढला : महाराष्ट्रातील वटवाघूळांमध्ये आढळला ‘निपाह’ विषाणू

pradnya p

मुलांसाठीची लस सप्टेंबरपर्यंत शक्य

Patil_p

जगभरात मागील 24 तासात 2.60 लाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

न्यूझीलंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन, निवडणुका लांबणीवर

datta jadhav

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 23 हजार 077 वर, तर कोरोनामुक्तीचे प्रमाण 20.57 टक्के

prashant_c
error: Content is protected !!