तरुण भारत

शिवराज सिंह चौहान मंत्रिमंडळाचा विस्तार, 20 कॅबिनेटसह 8 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मंत्रीमंडळाचा आज दुसरा विस्तार करण्यात आला.  राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना शपथ दिली. एकूण 28 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात 20 कॅबिनेट मंत्री आणि 8 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे.  यात गोपाल भार्गव, विजय शाह, यशोधरा राजे सिंधिया यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

Advertisements


राजभवनात  राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. गोपाल भार्गव, विजय शाह, जगदीश देवडा, बिसाहूलाल सिंह, यशोधरा राजे सिंधिया, भूपेंद्र सिंह, एंदल सिंह कसाना, बृजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, प्रद्युम्न सिंह तोमर, ओम प्रकाश सकलेचा, उषा ठाकुर, प्रेम सिंह पटेल, हरदीप सिंह डंग, महेंद्र सिंह सिसोदिया, अरविंद सिंह भदौरिया, डॉ. मोहन यादव आणि राज्यवर्धन सिंह यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

तर भारत सिंह कुशवाहा, इंदर सिंह परमार, रामखेलावन पटेल, रामकिशोर कांवरे, बृजेंद्र सिंह यादव, गिरिराज डंडोदिया, सुरेश धाकड आणि ओपीएस भदौरिया यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Related Stories

दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश; निकाल पाहण्यात अडचणी

Abhijeet Shinde

केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी

datta jadhav

भारतीय सैन्यासमोर चीनने उतरविले रोबोट

Amit Kulkarni

TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

datta jadhav

सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर लष्करी महिला अधिकाऱ्यांना न्याय

Patil_p

मुंबईत संशयित दहशतवादी ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!