तरुण भारत

इंधन दरवाढीविरोधात बैलगाडीतून निषेध रॅली

राष्ट्रवादीचे तहसिलदारांना निवेदन : पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घेण्याची मागणी

वार्ताहर / वैभववाडी:

Advertisements

दिवसेंदिवस महागाईबरोबरच पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असून केंद्र शासन पेट्रोल-डिझेलची दरवाढ रोखण्यास अपयशी ठरले आहे. या विरोधात वैभववाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयापर्यंत बैलगाडीतून निषेध रॅली काढून पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदन देण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ करण्यात येत आहे. आधीच कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. तात्काळ दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी वैभववाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शासनाचा प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांकडे केली आहे. वैभववाडी तालुक्मयातील संभाजी चौकातून बैलगाडीतून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन शासनाच्या दरवाढीचा निषेध करीत हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बँक संचालक गुलाबराव चव्हाण, प्रदीप प्रभू, डी. के. सुतार, भिकाजी लसणे, संतोष झोरे, संतोष खरात, प्रदीप चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

दोडामार्गात चमकणाऱया जंगलाचे अद्भूत आश्चर्य

Patil_p

तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा गजबजला देवरुखचा आठवडा बाजार

Patil_p

व्यापाऱयांना शासनाकडून मदत मिळावी!

NIKHIL_N

आता पर्यटनासाठी ‘अनुभवजन्य’ किल्ले पर्यटन योजना

NIKHIL_N

वेंगुर्ले शहरातील गटारे पावसाळ्यापूर्वी साफ करा-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Ganeshprasad Gogate

किरकोळ वादातून दोन भावांवर सुऱयाने वार

Patil_p
error: Content is protected !!