तरुण भारत

जेव्हा संतप्त युनूसने ग्रँट फ्लॉवरच्या मानेवर सुरी धरली!

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

फलंदाजीसाठी काही सल्ले दिल्याच्या रागातून माजी कर्णधार युनूस खानने एकदा आपल्या मानेवर सुरी रोखत मारण्याची स्पष्ट धमकी दिली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट माजी पाकिस्तानी फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवरने केला. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर असताना हा प्रकार घडला असल्याचा फ्लॉवरचा दावा आहे. 49 वर्षीय ग्रँट फ्लॉवरने 2014 ते 2019 या कालावधीत पाकिस्तानी क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद हाताळले आहे.

Advertisements

‘भले, युनूस खान फलंदाजीतील मास्टर होता. पण, ब्रिस्बेनमध्ये ब्रेकफास्ट घेत असताना त्याने संतापातून जी कृती केली, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यावेळी कसोटी सामन्यापूर्वी मी त्याला फलंदाजीत काही सल्ले दिले. पण, त्याला याचा राग आला आणि हातातील सुरी त्याने थेट माझ्या गळय़ापर्यंत आणली. मिकी आर्थर आमच्या शेजारीच होता. त्याने हस्तक्षेप केला. अर्थात, इतका अपवाद वगळता प्रशिक्षकपदाचा आनंद मी नेहमीच लुटला’, असे फ्लॉवरने पुढे नमूद केले.

युनूसने पाकिस्तानतर्फे 118 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले असून त्यात 52.05 च्या सरासरीने 10099 धावांचे योगदान दिले आहे. युनूस खान सध्या पाक संघासमवेत इंग्लंड दौऱयावर फलंदाज प्रशिक्षक म्हणून गेला आहे. फ्लॉवरने हा दावा केल्यानंतर युनूसने अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फ्लॉवरने झिम्बाब्वेतर्फे 67 कसोटीत 3457 व 221 वनडेत 6571 धावांचे योगदान दिले आहे. फ्लॉवर सध्या लंका संघाचा फलंदाज प्रशिक्षक आहे. फ्लॉवरने उल्लेख केलेली घटना 2016 मधील ऑस्ट्रेलिया दौऱयातील ब्रिस्बेन कसोटी वेळची आहे. युनूस त्या सामन्यातील पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता तर दुसऱया डावात 65 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या मालिकेतील सिडनीत झालेल्या तिसऱया व शेवटच्या कसोटीत त्याने नाबाद 175 धावांची शतकी खेळी केली होती. मात्र 2016-17 मधील ही मालिका पाकने 3-0 अशी गमविली होती. पाकचा आणखी एक खेळाडू अहमद शेहजाद हा कुशल फलंदाज असला तरी काहीसा बंडखोर असल्याचेही फ्लॉवरने सांगितले.

Related Stories

पंजाब एफसीच्या ट्रान्स्फर विंडोवरील बंदी मागे

Patil_p

माजी टेनिसपटू इव्हानिसेव्हिकला कोरोनाची बाधा

Patil_p

अर्सेनेल पराभूत, लिसेस्टरचा सामना बरोबरीत

Patil_p

बायर्न म्युनिचच्या सुलेला कोरोनाची लागण

Patil_p

रॉजर फेडररचा आश्चर्यकारक विजय

Patil_p

विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप फायनल पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणेच

Patil_p
error: Content is protected !!