तरुण भारत

धक्कादायक: एकाच दिवशी बार्शीत ३६ कोरोना पॉझिटिव्ह

बार्शी / प्रतिनिधी:

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बार्शी तालुक्यामध्ये वेगाने वाढत असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. गुरुवार दि. दोन जुलै रोजी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये 36 रुग्ण कोरोणा पॉझिटिव्ह आले असून आता बार्शीची रुग्णसंख्या 94 इतकी झाली आहे. तर आजच्या दिवशी वैराग येथील दोन रुग्ण मयत झाले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार बार्शी शहर तालुक्यामध्ये वेगाने होत असून आता ही चिंतेची बाब बनली आहे.

आज प्राप्त झालेल्या कोरोणा अहवालानुसार बार्शी शहरातील 18 अहवाल पॉझिटिव आले असून त्यात बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी असणाऱ्या सब जेल मधील 11 कैद्यांना कोरोना झाला आहे उर्वरित अहवाल यापैकी बार्शी येथील नाळे प्लॉट या ठिकाणी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून मंगळवार पेठ येथे एक, उपळाई रोड येथे एक ,आदर्श नगर नागणे प्लॉट या ठिकाणी तीन, शंकेश्वर भवन कसबा पेठ या ठिकाणी एक असे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवाला पैकी वैराग या ठिकाणाहून आठ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून त्यात गवंडी गल्ली वैराग येथे एक, परीट गल्ली येथे दोन, नवीन चाटी गल्ली येथे एक, संतनाथ गल्ली येथे दोन, शारदादेवी नगर येथे दोन अशी एकूण आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील साकत पिंपरी या गावातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून माढा तालुक्यातील रिधोरे आणि भोसरे या ठिकाणी असणारे रहिवाशी मात्र बार्शी शहरात खाजगी हॉस्पिटल येथे उपचार घेत असणारे प्रत्येकी एक असे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या अहवालामध्ये दोन व्यक्ती मयत झाले असून या व्यक्ती बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार घेत होत्या या दोन्ही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या वैराग येथील आहेत.

आता बार्शीची रुग्ण संख्या एकूण 94 एवढी झाली असून त्यापैकी 28 जण उपचारानंतर बरे झाले आहेत सध्या 26 जनावर कॉर्बेट केअर सेंटर व जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहेत.

बार्शी तहसील येथे असणाऱ्या सब जेलमध्ये हे एका पोलीसाच्या माध्यमातून कायद्यांना कोरोना ची लागण झाली होती या सब जेल मध्ये अजून बारा कैदी असून त्यांनाही त्रास होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे तरी बाकी कैदी याना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी शिफ्ट केले जात असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली.

Advertisements

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये 345 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

शासनाच्या दिरंगाईमुळे पुनर्वसन न झाल्याने पूरग्रस्तांची ससेहोलपट

Abhijeet Shinde

चार लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला माघी एकादशी सोहळा

Abhijeet Shinde

जयसिंगपूरात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि माजी नगराध्यक्षा कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

राष्ट्रीय आपत्तीत शिक्षक झाले पोलीस

Patil_p

Raigad landslide: ४४ मृतदेह काढले बाहेर; आख्खं गाव स्मशानात बदललं

Abhijeet Shinde
error: Content is protected !!